Maharashtra News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert : दिवाळीत पावसाचा धुमाकूळ! कोकण-मराठवाडा अन् विदर्भाला झोडपणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra News : मान्सून माघारी गेल्यानंतरही पावसाला पोषक हवामान निर्माण झाले आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Alisha Khedekar

  • मान्सून माघारी गेल्यानंतरही राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झालं आहे

  • कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे

  • बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत आहेत

  • राज्यात काही भागात उकाडा आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे

राज्यातून मान्सून गेला असला तरी पावसाला पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे. काल मुंबईसह उपनगरांत जोरदार वाऱ्यासह पावसाची रिमझिम पाहायला मिळाली. तर कोकणातही पावसाने हजेरी लावली. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाची झळ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शिवाय पुढील आठवड्यात बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. महाराष्ट्रात काही प्रमाणात ढगाळ हवामान, उन्हाचा चटका आणि उकाडा अनुभवायला मिळत आहे.

कमाल तापमानाचा पारा ३२ अंशांपार असल्याने नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. गुरुवारी सकाळपर्यंत २४ तासांत चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३६.४ अंश सेल्सिअस, ‎‎रत्नागिरी येथे ३५.६ अंश सेल्सिअस, ‎सांताक्रूझ, ‎अकोला, अमरावती आणि जळगाव येथे ३४ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

पावसाला पोषक हवामान झाल्याने काल दुपारनंतर कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. कोकणात सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या.

आज कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामान पाहायला मिळणार आहे. तर काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात हवामान मुख्यतः कोरडे राहून, राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार? राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाकडून संजय राऊत बरे होण्यासाठी महाआरतीचं आयोजन

Egg Safety Facts: अंडे का फंडा! अंडी फ्रिजमध्ये ठेवावीत की नाही?

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT