Prabhul Lodha, now accused of rape, at the center of Maharashtra’s honey trap scandal involving MLAs, MPs, and ministers. Saam Tv
महाराष्ट्र

Honey Trap: महाराष्ट्र हनी ट्रॅपच्या विळख्यात? अखेर लोढाच्या पापाचा घडा फुटला,पोलीसच ट्रॅपसाठी फिरवायचे 'हंटर'?

Sanjay Raut's Bombshell: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवणाऱ्या हनी ट्रॅपमध्ये नवा ट्विस्ट आलाय.... अधिकारी ते मंत्री या ट्रॅपमध्ये कसे अडकले आहेत? आणि हा ट्रॅप कसा रचला जातो?

Bharat Mohalkar

याच प्रफुल्ल लोढावर राज्यभर गाजत असलेल्या हनी ट्रॅपचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप....मात्र आता याच लोढाच्या पापाचा घडा फुटलाय..नाशिक आणि मुंबईनंतर पिंपरी चिंचवडच्या बावधनमध्ये प्रफुल्ल लोढावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय....महायुतीचे 16 आमदार, 4 तत्कालिन खासदार आणि 4 मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा दावा खासदार राऊतांनी केला होता... तर या हनी ट्रॅपचे धागेदोरे फक्त नाशिक, ठाणे, मुंबईच नाही तर पुण्यापर्यंत पोहचलेत

सरकार हनी ट्रॅप प्रकरण नाकारत असलं तरी हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत चौकशीला सुरुवात केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय...

अधिकाऱ्यांनी 'त्या' हॉटेल चालकाच्या संस्थांना मदत केलीय का? याची चौकशी

हॉटेल व्यावसायिकाच्या जमीन व्यवहाराबाबत सखोल तपास होणार

अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल्स आणि संबंध तपासणीच्या चौकटीत

तपासात संशयास्पद आर्थिक देवाण-घेवाण उघड होण्याची शक्यता

गुन्हे शाखा आणि गुप्तचर विभाग संयुक्त माहिती संकलन मोहीम राबवणार

हनी ट्रॅपच्या मुळापर्यंत पोहचण्यासाठी वेगाने चौकशी होणार

एवढंच नाही तर अल्पवयीन बांग्लादेशी मुलींचा वापर करत चक्कं ACP दर्जाचे पोलीस अधिकारीच हंटर फिरवून हनी ट्रॅप लावत असल्याचा खळबळजनक आरोप पीडित महिलेने केलाय...तर या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी करुणा मुंडेंनी केलीय...

विरोधकांनी प्रचंड ताकदीने हे प्रकरण लावून धरलंय... त्यामुळेच की काय सरकारने या प्रकरणाची गुप्त चौकशी सुरु केल्याची चर्चा रंगलीय... त्यामुळे फक्त प्रफुल्ल लोढावर कारवाई करुन हे प्रकरण थंड बस्त्यात जाणार की महाराष्ट्राला विळखा घालणाऱ्या हनी ट्रॅप मध्ये बडे मासे सापडणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT