Devendra Fadnavis  Saam TV
महाराष्ट्र

राज्यात जुलै अखेरीस ४८४८ सायबर गुन्हे, नेपाळ कनेक्शन झालं उघड, गृहमंत्री फडणवीस म्हणाले...

राज्यातील सायबर गुन्ह्यांचे नेपाळ कनेक्शन माहितेय का ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रामनाथ दवणे

मुंबई : राज्यात सायबर गुन्ह्यात प्रचंड वाढ होत असून त्यांचे केंद्र नेपाळमध्ये आहे, असे गुन्हे मोडीत काढण्याच्या उपाययोजना सुरू आहेत. सायबर गुन्ह्याचे (Cyber cases in Maharashtra) काही अॅप नेपाळमधून चालतात. फोनही तेथून येतात. या प्रकरणात ज्येष्ठ नागरिकांना आकृष्ठ केले जाते. फोन करून ते सांगतील त्याप्रमाणे पैसे भरल्यानंतर ते पैसे गायब होतात. ते पैसे त्यांच्या वॅलेटमध्ये जमा होतात. यात मॅट्रिमोनियल साईटच्या (Matrimonial Site) मार्फत अनेक गुन्हे होतात. राज्यात जुलै २०२२ अखेर ४८४८ सायबर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी ६३६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. या प्रकरणात ६५२ आरोपींना अचक करण्यात आली आहे, माहिती विधान परिषद सभागृह नेते (Devendra Fadnavis) आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

यापैकी ऑनलॉईन बँकिंग फसवणुकीचे २१०१ गुन्हे दाखल झाले आहेत. यात ७५ गुन्ह्यांची उकल झाली असून ६१ जणांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहार ऑनलाईन करण्यात झालेली वाढ आणि सोशल मीडियाचा वाढता वापर यामुळे सायबर गुन्ह्यात वाढ झाल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी याबाबत लक्ष्यवेधी उपस्थित केली होती. कायंदे म्हणाल्या की, राज्यात सायबर गुन्ह्यात प्रचंड वाढ झालेली आहे.

यात विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य केले जाते.गेल्या पाच महिन्यात राज्यात नोंदविलेल्या सायबर गुन्ह्यांची आकडेवारी पाहता ऑनलाईन बँकिंग फसवणुकीचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर होत आहेत.केवायसी विचारली जाते, ओटीपी मिळविली जाते आणि कर्ज मिळवून देण्याची बतावणी केली जाते.अशा वेळी ज्येष्ठ नागरिक त्या बतावणीत फसतात आणि त्यांचे बँक अकाऊंट खाली होते. मागील वर्षभरात राज्यात 2,883 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली. मात्र त्यापैकी अवघ्या 455 गुन्ह्यांची उकल झाली. सायबर गुन्ह्यात होत असलेली वाढ रोखण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता असल्याकडे मनीषा कायंदे यांनी लक्ष वेधले. या प्रकरणी सतेज पाटील,राजहंस सिंह, सचिन अहिर यांनीही भाग घेतला.

सायबर गुन्ह्यांचा तपास करणारी यंत्रणा असलेली एमएमआरएडीची इमारत पीडब्यूडीच्या ताब्यात असली तरी ती एमएमआरडीएला दुरुस्ती करण्यास सांगण्यात आले आहे. या गुन्ह्यांचा उकल करण्यासाठी 34 लॅब सुरू केल्या आहेत. त्यासाठी मनुष्यबळ प्रगत करण्यात येत आहे. टेक्नॉलॉजा दरवर्षी अपग्रेड होते.मात्र माणसे अपग्रेड होत नाही.त्यासाठी प्रशिक्षित माणसे भरण्यात येत आहेत यासाठी मॅसिव्ह कॅंपेन करणार आहोत.सायबर गुन्ह्यात सामान्य माणसे फसली जाऊ नयेत म्हणून केंद्र सरकारने व्यवस्था केलेली आहे. आपण त्यात जोडले गेलो आहोत.संभाव्य सायबर गुन्हे टाळण्यासाठी सोशल मीडियाद्वारेदेखील सामान्य नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT