Mumbai | विलेपार्लेतील जखमी गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

गोविंदांसह सर्वसामांन्यांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायलं मिळालं. मात्र, सोमवारी दुर्देवाने उपाचारादरम्यान मुंबईत एका जखमी गोविंदाचा मृत्यू झाला आहे. या गोविंदाच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
 file photo
file photo saam tv
Published On

Mumbai News : मुंबई राज्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात शुक्रवारी दहीहंडीचा (Dahi Handi) सण साजरा करण्यात आला. यंदाच्या वर्षी सरकारकडून कोरोनाचे कोणतेही निर्बंध लादण्यात आले नव्हते. त्यामुळे गोविंदांसह सर्वसामांन्यांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायलं मिळालं. मात्र, सोमवारी दुर्देवाने उपाचारादरम्यान मुंबईत एका जखमी गोविंदाचा मृत्यू झाला आहे. या गोविंदाच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 file photo
Badlapur |एसी लोकलच्या विरोधात बदलापूरकर संतप्त; थेट स्टेशन मास्तरांनाच घातला घेराव

विलेपार्ले पूर्व येथील शिवशंभो पथकातील गोविंदा संदेश दळवी हा दहीहंडीच्या दिनी थरावरून पडून जबर जखमी झाला. विलेपार्ले येथे विमानतळ जवळील हंडी फोडताना अपघात झाला होता. जखमी गोविंदावर वैद्यकीय उपाचार नानावटी रुग्णालयात सुरु होते. या जखमी गोविंदावर शुक्रवारपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्याचा आज, सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

संदेशच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संदेश हा मुंबईच्या विलेपार्ले येथे राहायला होता. संदेशची परिस्थिती हलाखीची असून त्याची आई घरकाम करते. संदेशच्या मृत्यूनंतर विलेपार्ले परिसरात शोककळा पसरली आहे.

 file photo
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून अजित पवारांनी शिंदे सरकारला घेरलं; सभागृहात मांडला महत्वाचा मुद्दा

दरम्यान, संदेशच्या मृत्यूनंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दरेकर म्हणाले, 'या गोविंदाच्या मृत्यूचं कोणीही राजकारण करू नये. शिंदे सरकार हे संवेदनशील आहे. शिंदे सरकार सर्व मदत देणार आहे'.

दरेकरांनी संदेशच्या मृत्यूनंतर सवाल करत शिवसेनेवर टीका केली आहे. 'गोविंदाच्या मृत्यूं भांडवल म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाताय ? असा सवाल करत दरेकरांनी निशाणा साधला. उद्धव ठाकरेंची शिवसेना हे चुकीचं करत आहे, असेही दरेकर म्हणाले.

मंत्री गिरीश महाजन यांनी देखील घटनेवर दुःख व्यक्त केलं. गिरीश महाजन म्हणाले, 'गोविंदा संदेश दळवीचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. दोन दिवसांपासून त्याच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला आज नानावटीत दाखल केलं. त्याच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत तर आहेच, पण त्याच्या कुटुंबीयांचे पुनर्वसनासाठी सरकार पूर्ण करणार आहे. कुटुंबीयांच्या आग्रहामुळे त्यांनी त्याला नानावटीत नेलं. आवश्यकता असेल तर या पूर्ण घटनेची चौकशी केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी दहीहंडी मंडळासोबत आज चर्चा केली. नियमावली पालन झालं की नाही याची चौकशी करणार आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com