HIGH COURT TYPING EXAM CONTROVERSY saam tv
महाराष्ट्र

अभिजीत दीपकेंचं महाराष्ट्रात आंदोलन सुरू; मोठ्या संख्येने Gen-Z रस्त्यावर, सरकारचं टेन्शन वाढलं

High Court Typing Exam 2026 Paper Leak Allegations In Maharashtra: महाराष्ट्रातील हायकोर्ट टायपिंग परीक्षेत तांत्रिक अडचणी आणि पेपरफुटीच्या आरोपांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप. छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन; अभिजीत दीपके यांची फेरपरीक्षेची मागणी

Omkar Sonawane

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आता राज्यात आंदोलन सुरू केले आहे. NEET आणि TET परिक्षा पेपर फुटीचे प्रकरण ताजे असताना उच्च न्यायालयाच्या लिपीक पदासाठी रविवारी घेण्यात आलेला पेपर देखील फुटला आहे. याच प्रकरणाची अभिजीत दीपके यांनी गंभीर दखल घेतली असून थेट छत्रपती संभाजीनगरच्या कोर्टाबाहेर ठिय्या मांडला आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने तरुण जमा झाले असून पोलिस अभिजीत दीपके यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये हायकोर्ट टायपिंग स्किल स्टेट परीक्षेदरम्यान गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सुराणा नगर येथील Bytez's Infotech परीक्षा केंद्रावर टायपिंग सॉफ्टवेअर व्यवस्थित काम करत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. परीक्षेसाठी सकाळी 10 वाजता केंद्रावर दाखल झालेले विद्यार्थी बराच वेळ परीक्षा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत होते. तर दुपारी 12.15 वाजता दुसरी बॅच सुरू होणार होती. मात्र, पहिल्याच बॅचमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली.

टायपिंगसाठी वापरण्यात येणारे कीबोर्ड जुने असल्याचा तसेच संगणकाच्या स्क्रीनवर फॉन्ट खूपच छोटा दिसत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे टाईप करताना मोठ्या अडचणी येत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेले विद्यार्थी परीक्षा केंद्राबाहेर रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिस अधिकारीही परीक्षा केंद्रावर दाखल झाले आहेत.

दरम्यान, तांत्रिक अडचणी असलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षा न घेता कोर्टातच परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळेचे आणि कामगिरीचे नुकसान होऊ नये, अशीही विद्यार्थ्यांची मागणी आहे.

कल्याणमध्ये हायकोर्ट टायपिंगची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी पेपरफुटीचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. परीक्षेतील पॅसेज व्हॉट्सअॅपवर आधीच मिळाल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली असून, यासंदर्भात मूळ पॅसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणी कल्याणमधून परीक्षा दिलेल्या एका उमेदवाराने अभिजीत दीपके यांना फोन करून आपली व्यथा मांडली. यावेळी विद्यार्थी भावुक झाल्याचंही समोर आलं.

विद्यार्थ्यांनी पेपरफुटीचा आरोप केल्यानंतर अभिजीत दीपके यांनी फेरपरीक्षेची मागणी करत विद्यार्थ्यांना ठाम राहण्याचं आवाहन केलं. री-एक्झाम झाल्याशिवाय तुम्ही तिथून हलू नका, आम्ही सुद्धा इथे बसून राहणार आहोत, असं दीपके यांनी सांगितलं. तसंच, जोपर्यंत जिल्हा न्यायाधीशांचे जे जे अधिकारी परीक्षेतून खाली येत नाहीत, तोपर्यंत कोणीही हलायचं नाही. हेच आपलं जंतर-मंतर आहे, असंही अभिजीत दिपके म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT