maharashtra news Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Rains: पावसाचा हाहाकार, ४ जिल्ह्यात शाळांना सुट्टी, मराठवाडा-विदर्भाचा संपर्क तुटला, परिस्थिती पुन्हा भयानक

Maharashtra Flood Alert: महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा हाहाकार. नांदेड, हिंगोली, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात शाळांना सुट्टी. पैनगंगा नदीला पूर, सोलापूरमध्ये रेड अलर्ट, यवतमाळमध्ये घर कोसळले.

Namdeo Kumbhar

Maharashtra heavy rain latest update Schools closed due to heavy rainfall in Latur, Hingoli, Nanded, Dharashiv : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने थैमान घातले आहे. नांदेड, हिंगोंली, धाराशिव, लातूरसह पुन्हा एकदा पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली आहे. आधीच्याच पावसामुळे शेतकरीराजा संकटात सापडला होता. त्यात आता पुन्हा एकदा पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे पैनगंगा नंदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी हिंगोली-पूसद हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हिंगोलीच्या कळमदूरी तालुक्यातील माळेगाव परिसरात पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसह वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. अनेक वाहने रस्त्यावर अडकून पडली आहेत. दुसरीकडे लातूर जिल्ह्यातील मान्याड नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे. शेणकुडमधील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

चार जिल्ह्यात शाळांना सुट्टी -

पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील ४८ तास राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यता आला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील चार जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. लातूर,धाराशिव, हिंगोली आणि नांदेडमध्ये शाळांना सुट्टी जाहीर कऱण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर केली आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा पावसाने हाहाकार माजवाल आहे. पुढील दोन दिवस राज्यात अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाकडून आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

सोलापूरमध्ये पावसाचा हाहाकार

सोलापूर जिल्ह्याला हवामान विभागाने आज रेड अलर्ट जारी केला आहे. सकाळपासून सोलापूर शहरात पावसाचा जोर वाढला आहे. सोलापूरसह अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यात पाऊस झाला तर पुन्हा सोलापूर जिल्ह्यात महापूर येण्याची शक्यता झाली निर्माण झाली आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यात आज पहाटेपासून सुरु असणाऱ्या जोरदार पावसामुळे उळे - कासेगाव पूल पुन्हा पाण्याखाली गेला आहे. उळे - कासेगाव पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. कासेगावचा संपर्क तुटला आहे. उळे - कासेगाव पुलावरून पाण्याचा प्रवाह जोरदार वाहत असल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता झाली निर्माण झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून उळे - कासेगाव या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे.

मुसळधार पावसामुळे घर कोसळलं

यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील कोळी गावात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सकाळी दरम्यान ठाकूरसिंग राठोड याचं घर कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घर पूर्णपणे कोसळल्याने कुटुंब बेघर झाले असून, पावसाच्या दिवसात राहण्यासाठी जागेचा प्रश्न उभा राहिला आहे.गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अवकाळी आणि मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे ओलसरपणा आणि पाण्याचा भार वाढल्याने घराच्या भिंती कमकुवत होऊन कोसळल्या. घरातील सदस्य सुदैवाने वेळेत बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दहशतवाद कधी थांबेल? भारत तुम्हाला...; पत्रकाराच्या प्रश्नावर पाक पंतप्रधान भडकले, उत्तर न देताच निघून गेले

GK: जगातील पहिली कागदी नोट कोणत्या देशाने बनवली? जाणून घ्या इतिहास

Today Gold Rate: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोनं महागलं; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Vastu Tips Of Camphor: घरात या ठिकाणी जाळा कापूर, वास्तुदोष होईल दूर, जाणून घ्या फायदे

Maharashtra Live News Update: पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाट बंद

SCROLL FOR NEXT