Maharashtra Rain Update : राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढलेला पाहण्यास मिळत आहे. मागील दोन- तीन दिवसात अनेक भागात जोरदार पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरु आहे. सलग पाऊस होत असल्याने नदी, नाल्यांना पूर आला आहे. प्रामुख्याने नाशिक. वर्धा, अकोला, बुलढाणा, नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक आहे. दरम्यान अकोल्याच्या मेहेकर तालुक्यात पावसाचा कहर पाहण्यास मिळत आहे.
मेहकर तालुक्यात कालवा फुटल्याने शेती खरडून गेली
बुलढाणा : जिल्ह्यात सततधार पाऊस होत असल्याने मेहेकर् तालुक्यातील मारोती पेठ येथील लघु प्रकल्प तुडुंब भरला आहे. तसेच तालुक्यातील नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर काही ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत. मारोती पेठ येथील लघु प्रकल्पाचा कालवा फुटल्याने असंख्य शेतकऱ्यांच्या शेती खरडून गेल्या आहेत. पेरणी झालेल्या शेती वाहून गेल्या आहेत. त्यामुळे या पावसाने जिल्ह्यातील काही भागात पावसाने कहर केला आहे.
अकोल्यात जोरदार पाऊस
अकोला : सलग दुसऱ्या दिवशी अकोला शहरासह जिल्ह्यात पावसाची जोरदार रिपरिप सुरू आहे. मागील दिवसांपूर्वी पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य लोक चिंतेत होते. मात्र काल सकाळपासून सुरू झालेला पाऊस पिकांना नवसंजीवनी देणारा आहे. पावसामुळे शहरातील सकल भागात पाणी साचले आहे. दरम्यान, २९ जूनपर्यंत पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम आणि अकोला या जिल्ह्यात पावसाचा इशारा आहे.
नाशिकमध्ये पूरस्थिती कायम
नाशिक : नाशिक शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. आज सलग आठव्या दिवशी नाशिकमध्ये पूरपरिस्थिती कायम आहे. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पुराचं पाणी आले आहे. यातच रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरात पर्यटकांची स्टंटबाजी पाहण्यास मिळत असून पुराच्या पाण्यात सेल्फी आणि फोटोसेशन करण्यासाठी पर्यटक आणि भाविकांचा अट्टाहास सुरु आहे.
नर्मदा काठावरील गावांचा संपर्क तुटला
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. यामुळे सातपुड्यातील नद्यांना पूर आलेला आहे. सततच्या पावसामुळे जांगठी ते मणिबेली रस्त्यावर दरड कोसळली आहे. उंच डोंगरांवरनं दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला आहे. यामुळे अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा काठी असलेल्या गावांचा संपर्क तुटला आहे.
ऊतावळी नदीला पूर
वाशीम : वाशिम जिल्ह्यात गेल्या २० तासापासून पडत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी नाले तुडुंब भरल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे नागपूर– संभाजीनगर महामार्गावर असलेल्या पिंपरी सरहद्द गावाजवळील उतावळी नदीला पुर आल्याने पाणी पुलावरून वाहत आहे. त्यामुळं जवळपास सहा हे सात तासापासून या मार्गावरची वाहतुक ठप्प झाली आहे. दोन मार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.