Raj Thackeray Saam TV
महाराष्ट्र

Raj Thackeray: उष्णतेची लाट, पारा 40 अंशापार; शाळांना सुट्टी द्या, राज ठाकरेंची सरकारला सूचना

Maharashtra Weather News: एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरु असताना दुसरीकडे राज्यात उष्णतेचा कहर पहायला मिळतोय. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वरती गेलंय. सगळेच जण घामाघुम झाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Raj Thackeray News:

एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरु असताना दुसरीकडे राज्यात उष्णतेचा कहर पहायला मिळतोय. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वरती गेलंय. सगळेच जण घामाघुम झाले आहेत. घराबाहेर पडणे कठीण झालं आहे. दुपारच्यावेळी रस्ते निर्मनष्यु होत आहेत. अरबी समुद्रावरून आद्रर्तायुक्त उष्ण वारे किनारपट्टीच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबईसह किनारपट्टीवर सोमवारी कमाल तापमानात सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली.

मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे. हवामान विभागाने मुंबईसह ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. दोन दिवस सलग तापमान हे सामान्यपेक्षा ४.५ अंश सेल्सिअस ने अधिक वाढल्यास त्याला उष्णतेची लाट आल्याचे संबोधले जाते. यावरुनच राज ठाकरेंनी हवामान खात्याच्या अंदाजावरही बोट ठेवलंय. तसंच सरकारनं शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करावी, अशी सुचना केली आहे.

राज ठाकरे ट्वीट करत म्हणाले आहेत की, ''गेले काही दिवस दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास 40 अंशांपर्यंत गेलंय. अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाहीये. उष्णतेची लाट आली आहे असं जाहीर झालं आहे. मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं आधीच का नोंदवली नाही? हा मुद्दा आहे. असो...सरकारनं शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी. माझी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना पण विनंती आहे की, स्वतःची काळजी घ्या. आणि प्राणी, पक्षी आणि निराधार,बेघर लोकांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल याची तजवीज करा.''

राज्यात निवडणूक प्रचारानेही वेग घेतला आहे. मात्र कडक उन्हाचा फटका नेते, कार्यकर्त्यांनाही बसतोय. धाराशीवमध्ये मविआचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या रॅलीत शिवसेना आमदार कैलास पाटील यांना चक्कार आली. उष्माघातामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करावं लागलं.

कुठे किती तापमान?

मुंबई 39.7

ठाणे 42.8

नवी मुंबई 42

कल्याण 42.4

मालेगाव 42

औरंगाबाद 37

नागपूर 39

रत्नागिरी 33

एप्रिलमध्येच ही स्थिती असेल तर मे मध्ये पारा कितीवर जाईल याची धास्ती नागरिकांना आहे. वाढत्या उष्णतेमुळे घराबाहेर पडताना सर्वांनीच आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba Makeup Tips : गरबा खेळताना मेकअप अजिबात उतरणार नाही करा 'या' ट्रिक्स फॉलो

Pawan Singh: कुटुंब अचानक सेटवर आले अन्...; पॉवरस्टार पवन सिंहने मध्येच सोडला 'राईज अँड फॉल' शो

प्रायव्हेट फोटोवरून ब्लॅकमेल, छळाला कंटाळून प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती उघड

Crime: मध्यरात्री रक्तरंजित थरार! लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची हत्या, मैत्रिणीवरही चाकूने सपासप वार

PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता; तुमचं तर नाव नाही ना?

SCROLL FOR NEXT