nashik, maharashtra health science university declares result of exam held in october saam tv
महाराष्ट्र

MUHS Result 2022 : आरोग्य विद्यापीठाच्या भरती परीक्षेचा निकाल जाहीर; 'या' संकेतस्थळावर पाहा निकाल

या परीक्षेस प्रविष्ठ उमेदवारांना गुण पडताळणी सात दिवसांत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

साम न्यूज नेटवर्क

MUHS Result 2022 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आस्थापनेवरील गट-ब, गट-क व गट-ड संवर्गातील शिक्षकेतर पदांकरीता घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान निकाला संदर्भात खोटा संदेश व अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी केले आहे. (Maharashtra Health Science University Declares Result Marathi News)

डॉ. संदीप कडू म्हणाले विद्यापीठाच्या आस्थापनेवरील गट-ब, गट-क व गट-ड संवर्गातील रिक्त शिक्षकेतर पदांकरीता ऑक्टोबरमध्ये लेखी परीक्षा (exam) घेण्यात आली. राज्यातील एकूण 28 परीक्षा केंद्रांवर एकूण 14080 उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली आहे.

यामध्ये कक्ष अधिकारी, कक्ष अधिकारी (खरेदी), अधीक्षक, वरिष्ठ लिपिक कम डेटा इंट्री ऑपरेटर, वरिष्ठ सहायक, लिपिक कम टंकलेखक, डेटा एंट्री ऑपरेटर, निम्मश्रेणी व उच्चश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक, रोखपाल, भांडारपाल, सहायक लेखापाल, वीजतंत्री, छायाचित्रकार, आर्टिस्ट कम ऑडिओ अॅण्ड व्हिडीओ एक्सपर्ट, सांख्यिकी सहायक, वाहन चालक, शिपाई आदी संवर्गासाठी परीक्षा घेण्यात आली होती. (Maharashtra News)

या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. हा निकाल विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.muhs.ac.in) उपलब्ध आहे. या परीक्षेस प्रविष्ठ उमेदवारांना गुण पडताळणी सात दिवसांत करावी असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर पदनिहाय व संवर्गनिहाय गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल असेही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी नमूद केले.

उमेदवारांनी लेखी परीक्षेचा निकाल (result) विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळ (www.muhs.ac.in) येथेच पहावा. निकाला संदर्भात खोटा संदेश व अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन विद्यापीठाने केले आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

SCROLL FOR NEXT