अजित पवारच मुख्यमंत्री असतील, काळ्या दगडावरची भगवी रेष; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा (पाहा व्हिडिओ)

आज कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरात विठ्ठलाची पूजा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली.
Kartiki Ekadashi , Ajit Pawar, Amol Mitkari, Shirdi
Kartiki Ekadashi , Ajit Pawar, Amol Mitkari, Shirdisaam tv
Published On

- सचिन बनसोडे

Shirdi : राज्यातील शेतक-यांमध्ये सध्याच्या सरकार विषयी प्रचंड राेष आहे. त्यामुळे आगामी काळातील आषाढीतील एकादशीची पूजा महाविकास आघाडीचा (mva) मुख्यमंत्री करेल असा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला. शिर्डीत मिटकरी यांनी साम टीव्हीशी बाेलताना अजित पवार (Ajit Pawar) यांची प्रशासनावर उत्तम पकड असल्याने तेच भावी मुख्यमंत्री असतील असा विश्वासही व्यक्त केला. (Kartiki Ekadashi Latest Marathi News)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पंढरपुरात कार्तिकी एकादशीची पूजा संपन्न झाली. दरम्यान आषाढी एकादशीची पूजा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री करतील असे सूचक ट्विट राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे. त्याविषयी साम टीव्हीशी बाेलताना मिटकरी म्हणाले राज्यातील दाेन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी विठ्ठलास बळीराजा सुखी राहू असे साकडं घातले आहे.

Kartiki Ekadashi , Ajit Pawar, Amol Mitkari, Shirdi
MP Navneet Rana News : राणा-कडूंच्या शाब्दिक चकमकीनंतर पत्नी नवनीत राणा मैदानात (पाहा व्हिडीओ)

परंतु साकडं घालताना दाेन्ही नेत्यांच्या मनातील अंतर्भाव जाणवत नाही. राज्यातील शेतक-यांसाठी सरकार काहीच करत नसल्याने शेतक-यांमध्ये सरकारविषयी प्रचंड राेष आहे. त्यामुळे पुढच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) १०० पेक्षा अधिक आमदार निवडून येतील. अजित पवार (ajit pawar) हेच भावी मुख्यमंत्री होतील असा दावा अमाेल मिटकरी यांनी यावेळी केला.

Edited By : Siddharth Latkar

Kartiki Ekadashi , Ajit Pawar, Amol Mitkari, Shirdi
Satara News : पाेहायला गेलेल्या एकावर मगरीचा हल्ला; साेमवार पेठेत चर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com