Maharashtra Health Department Saam Tv
महाराष्ट्र

Health Department Recruitment: सार्वजनिक आरोग्य विभागात सर्वात मोठी भरती! १४४० पदांसाठी रिक्त जागा; पगार १.७७ लाख; आजच अर्ज करा

Medical Officer Recruitment Maharashtra Health Department: महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. मेडिकल ऑफिसर पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

सार्वजनिक आरोग्य विभागात नोकरीची संधी

मेडिकल ऑफिसर ग्रुप ए पदांसाठी भरती

१४४० पदांसाठी भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागात भरती जाहीर केली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने गट अ (मेडिकल ऑफिसर ग्रुप ए ) पदासाठी ही भरती होणार आहे. तब्बल १४४० रिक्त जागांसाठी पदभरती होणार आहे. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागात मेगा भरती निघाली आहे. त्यामुळे तुमच्याकडे सरकारी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने सरळसेवेच्या कोट्यातून ही सर्वात मोठी पदभरती जाहीर केली आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय आरोग्य अधिकारी गट - "अ" ची जाहिरात प्रसिद्ध काल करण्यात आली आहे.

वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी नोकरीची ही उत्तम संधी आहे. याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. वैद्यकीय ग्रुप ए पदासाठी निवड झाल्यावर उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळणार आहे. ५६१०० ते १,७७,५०० रुपये वेतनश्रेणीनुसार पगार मिळणार आहे.

आरोग्य विभागातील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने M.B.B.S असणे गरजेचे आहे. याचसोबत वैद्यकीय क्षेत्रात पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे.

यामध्ये महिलांसाठी ४३१ जागा राखीव आहेत. खेळाडूंसाठी ७२ जागा तर अनाथ मुलांसाठी १४ पदे राखीव आहेत.

यामध्ये त्यामध्ये VJ- NT- अ,ब,क,ड जसे की भटक्या जाती-जमाती प्रवर्ग (धनगर- वंजारी) साठी शून्य जागा देण्यात आल्या आहेत. मागील काही बिंदू नामावली मध्ये वारंवार भटक्या जाती -जमाती प्रशासनातली वरिष्ठ अधिकारी या समाजावर अन्याय करत आहे.आरक्षणाप्रमाणे त्या - त्या प्रवर्गासाठी राखीव जागा ठेवणे अपेक्षित आहे. त्या त्या पदभरतीसाठी जागा राखीव न ठेवता भरती केल्यास सरकारला येणाऱ्या काळात मतदानास्वरूपी किंमत मोजावी लागेल, असं सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! जुलैपासून लागू होणार 'लँड टायटलिंग ॲक्ट'; आता प्रत्येक फ्लॅटचे मिळणार 'मालमत्ता कार्ड'

Ladki Bahin Yojana: मे महिन्याची १० तारीख उजाडली! लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० की ४५०० रुपये येणार? पाहा सविस्तर अपडेट

Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्यासोबत कडाक्याचे भांडण, महिलेने ८ व्या मजल्यावरून मारली उडी

Maharashtra Farmer Loan : कर्जमाफीचा मोठा निर्णय! ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार; सहकार विभागाची सरकारला माहिती

SCROLL FOR NEXT