महाराष्ट्र

आरोग्य विभाग पदभरती घोळ; आता 'त्या' उमेदवाराची परत परीक्षा होणार (व्हिडिओ)

आरोग्य विभागाच्या ‘क’ व ‘ड’ वर्ग पदांसाठी झालेल्या लेखी परीक्षेला पेपर फुटीचे गालबोट लागले होते. मात्र, प्रत्यक्षात पेपर फुटलाच नाही, तर परीक्षा घेणाऱ्या विभागाच्या चुकीनेच आठ दिवसानंतर होणाऱ्या परीक्षेचा पेपर आधीच ‘क’ वर्ग पदासाठी परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थिंना देण्यात आला होता.

अॅड. जयेश गावंडे

अकोला : आरोग्य विभागाच्या Health Department ‘क’ व ‘ड’ वर्ग पदांसाठी झालेल्या लेखी परीक्षेला पेपर फुटीचे Paper Leak गालबोट लागले होते. मात्र, प्रत्यक्षात पेपर फुटलाच नाही, तर परीक्षा घेणाऱ्या विभागाच्या चुकीनेच आठ दिवसानंतर होणाऱ्या परीक्षेचा Examination पेपर आधीच ‘क’ वर्ग पदासाठी परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थिंना देण्यात आला होता. Maharashtra Health Department Exam Row asg68

दरम्यान याची बातमी सर्वात आधी 'साम टिव्ही'ने Saam TV ने दाखवली होती. आता याप्रकरणी 'ज्या उमेदवारांसोबत असा प्रकार झाला, त्या उमेदवाराला आरोग्य विभागाने पत्र देऊन पुन्हा परिक्षा घेणार असल्याचे कळविले आहे.

आरोग्या विभागातील ‘क’ वर्ग पदासाठीची लेखी परीक्षा ता २४ ऑक्टोबर २०२१ रोजी राज्यातील विविध केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेकरिता देण्याता आलेला पेपर उमेदवारांनी सोडविल्यानंतर त्याची उत्तर पत्रिका ता. २९ ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर उमेदवारांनी प्रश्नपत्रिकेनुसार उत्तर पत्रिका तपासून बघितली. तेव्हा प्रश्न व उत्तरांचा कुठेच ताळमेळ बसला नाही. Maharashtra Health Department Exam Row asg68

त्यानंतर दोन दिवस दिवसांनी ता. ३१ ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागातर्फे ‘ड’ वर्ग पदांसाठी लेखी परीक्षा राज्यातील विविध केंद्रांवर घेण्यात आली. यावेळी उमेदवारांना देण्यात आलेल्या पेपर पैकी एक पेपर संच हा आधीच उमेदवारांच्या हाती पडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे पेपर फुटल्याचा आरोपही झाला. पेपर आटोपल्यानंतर ‘क’ वर्गासाठी लेखी परीक्षा देणाऱ्या अकोल्यातील शारदा निरंजन येवले या उमेदवाराने तिच्याकडे असलेला पेपर हा ‘ड’ वर्ग पेपरशी जुळवून बघितला. त्यानंतर उत्तर पत्रिकेसोबतही जुळवून बघितला असता तो सारखाच असल्याचे आढळून आले.

त्यामुळे ‘क’ वर्ग पदासाठी झालेल्या लेखी परीक्षेच्या वेळसच ‘ड’ वर्ग पदासाठीचा पेपर उमेदवारांच्या हाती पडला होता. हाच पेपर पुढे ता.३१ ऑक्टोबरलाही उमेदवारांना लेखी परीक्षेच्या वेळेस मिळाल्याने पेपर फुटल्याचे आरोप झाले. प्रत्यक्षात पेपर फुटलाच नाही, तर विभागाच्या चुकीनेच तो वेळेपूर्वीच अन्य पदाच्या उमेदवारांनी लेखी परीक्षेच्या वेळेस देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. Maharashtra Health Department Exam Row asg68

याबाबत शारदा निरंजन येवले या उमेदवाराने आरोग्य विभागाकडे तक्रार केली. मात्र, तक्रारीची दखल न घेतल्याने यासंदर्भात साम टीव्ही न्युज ने याची बातमी दाखवली. दरम्यान आता पुणे येथील आरोग्य सेवा संचालनालय कडुन सदर उमेदवाराला पत्र प्राप्त झाले आहे. या उमेदवाराची परत परीक्षा होणार असल्याचे या पत्रात कळविण्यात आले आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

SCROLL FOR NEXT