राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींचा आज निकाल लागणार आहे. सकाळी ९ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत सर्वच ग्रामपंचायतीचे निकाल येणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आलं होतं. दरम्यान, या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून कुणाची सरशी? कोण मारणार बाजी मारणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
राज्यभरातील २ हजार ३६९ ग्रामपंचायतींपैकी अंदाजे २९३ ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत. शिवसेना-भाजपसोबत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. अनेक बड्या नेत्यांनी या निवडणुकीत आपला सक्रीय सहभाग दाखवला होता.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे, गुलाबराव पाटील, शहाजी बापू पाटील यासह अनेक बड्या नेत्यांची कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह भरला होता. तसेच मतदारांनाही अनेक आश्वासनं दिली होती.
पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा निकाल देखील आज समोर येणार आहे. त्यामुळे मतदाराने कोणाच्या बाजूने कौल दिला आहे, हे मतमोजणी नंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, राज्यात कोणकोणत्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या, यावर नजर टाकूयात
भाजपा - ६६
शिंदे गट - ५५
ठाकरे गट - २५
काँग्रेस - २०
शरद पवार गट - २०
अजित पवार गट - ६९
महायुतीकडे १९० ग्राम पंचायती आहेत, महाविकास आघाडीकडे ६५ ग्राम पंचायती आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.