Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Government Schemes: ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय! शासन देणार 60000 रुपये; जाणून घ्या काय आहे योजना

Government Schemes For OBC Students: सरकार इतर मागासवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विषेश मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान ज्योती सावित्री बाई फुले योजना लागू करणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> सुरज मसुरकर

Government Schemes For OBC Students:

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. सरकार इतर मागासवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विषेश मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान ज्योती सावित्री बाई फुले योजना लागू करणार आहे.

यातच वसतिगृहात प्रवेश न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकार कडून रक्कम दिली जणार आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे , पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारच्या वतीने 60 हजार अनुदान दिले जाणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तसेच तर क वर्ग महापालिका क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनासाठी 51 हजार दिले जाणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ४३ हजार दिले जाणार आहे. यांसोबतच तालुकाच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 38 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. याबाबत शासन निर्णयही जाहीर करण्यात आला आहे.  (Latest Marathi News)

शासन निर्णयात काय लिहिलं आहे?

याबाबतच्या शासन निर्णयात सांगण्यात आलं आहे की, ''वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान देण्याबाबत राबविण्यात येणाऱ्या आदिवासी विकास विभागाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम व सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाच्या धर्तीवर इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता योजना सुरु करण्यास मा मंत्रिमंडळाने 19.10.2023 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे.''

''त्यानुसार, सदर बैठकीत विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, अधिछात्रवृत्ती, वसतिगृह व वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता, स्वाधार, स्वयंम अशा विविध प्रकारच्या योजनांमध्ये तसेच यापुढे प्रस्तावित करण्यात येणाऱ्या योजनांमध्ये एकसमानता रहावी यासाठी सर्वंकष धोरण निश्चित करण्याबाबत संदर्भाधिन क्र. 6 अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.''

यात पुढे लिहिलं आहे की ''सदर शासन निर्णयान्वये मा.अ.मु.स. (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली 01.12.2023 रोजी आयोजित बैठकीत झालेल्या निर्णयानुसार इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्याथ्यांकरीता निर्वाह भत्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची मनोज जरांगेवर टीका, म्हणाले... VIDEO

5 स्टार रेटिंग असलेली कार १ लाखांनी स्वस्त, Nissan Magnite कारची नवीन किंमत किती?

Lonar News : जमिनीवर योग व आयुर्वेद हॉस्पिटल बांधण्याचा घाट; शेतीच्या बांधावरच शेतकऱ्याचे उपोषण

Movies Releasing This Week : 'आरपार' ते 'लव्ह इन व्हिएतनाम', 'या' आठवड्यात कोणते चित्रपट होणार प्रदर्शित?

Maharashtra Live News Update : अजित पवारांचं पाप देवेंद्र फडणवीसांनी लपवलं - विजय पांढरे

SCROLL FOR NEXT