Maharashtra government discontinues free saree scheme for women under Ladki Bahin Yojana amid financial constraints. saam tv
महाराष्ट्र

सरकारचा लाडकीला आणखी एक धक्का, लाडकींची मोफत साडी योजना बंद

Ladki Bahin Yojana Hit Again as Free Saree Plan Cancelled: आता बातमी लाडकी बहीणींसंदर्भातली.... मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांची नावे वगळण्यात आल्यानंतर आता सरकारनं लाडक्या बहिणींना आणखी एक धक्का दिलाय. काय आहे हा धक्का पाहूयात हा रिपोर्ट........

Saam Tv

लाडक्या बहिणींसाठी असलेली मोफत साडी वाटप योजना बंद करण्यात आलीय. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2023 मध्ये अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातल्या महिलांना दरवर्षी मोफत साडी देण्याची योजना सुरू केली होती. मात्र राज्याच्या तिजोरीवरील वाढत्या आर्थिक ताणामुळे ही योजना बंद करण्यात आलीय. वस्त्रोद्योग विभागाने ही योजना बंद करण्याचा शासन निर्णय जारी केलाय. काय होती ही योजना ते पाहूयात...

'लाडकीं'ची साडी योजना बंद

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या काळात जून 2023मध्ये योजना सुरू करण्यात आली.

शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी दरवर्षी एक मोफत साडी मिळायची.

राज्यातील सुमारे 25 लाख महिलांना दिवाळीत हा लाभ मिळत होता.

2023, 2024 आणि 2025 सलग 3 वर्षे साड्यांचं वितरण करण्यात आलं. योजनेसाठी सरकारकडून दरवर्षी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. राज्याच्या तिजोरीवर भार पडत असल्यामुळे योजना आता बंद करण्यात आलीय.

ही योजना बंद केल्यामुळे विरोधकांना सरकारला धारेवर धरण्यासाठी आयतं कोलित मिळालंय.राज्याची आर्थिक स्थिती सावरण्यासाठीच सरकारनं लाडकी बहीणसाठी निकष कडक केले. आता लाडक्या बहिणीच्या मोफत साड्या बंद केल्या. त्यामुळे पुढच्या काळातही अशा फुकट्या योजनांवर संक्रात येणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांना अखेर काँग्रेसचा पाठिंबा संसदेवरील मोर्चात राहुल गांधी उतरणार?

Maharashtra News Live Update: - भोर नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्या कार्यालयास सील.

फडणवीसांच्या नागपुरात ठाकरेंची रामरक्षा, ठाकरेंचं रामरक्षा पठण, सरसंघचालकांनाही निमंत्रण

Gram Panchayat Elections: राज्यातील 15,155 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल कधी वाजणार? कधी होणार मतदान?

मुंबईत गुटखा रॅकेटचा पर्दाफाश; गुजरातहून आलेला ३३ लाखांचा माल जप्त, चेकनाक्यावर अटकेचा थरार

SCROLL FOR NEXT