MLA Y Security News Saam TV
महाराष्ट्र

Shinde Government: सरकारच्या तिजोरीतून कोट्यवधींची उधळण; सत्तांतराच्या १०० दिवसांनंतरही बंडखोर आमदारांना Y दर्जाची सुरक्षा कायम

Maharashtra Politics: बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी १०० दिवसात तब्बल १७ कोटी ९३ लाख रुपयांचा खर्च झाल्याचं सांगितलं जातंय.

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

Aurangabad News: शिवसेना आमदारांनी बंड केले आणि राज्यात शिंदे गट-भाजप महायुतीचं सरकार आलं. बंडखोरी केल्याने शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडलेल्या शिंदे गटातील सर्व ४० आमदारांना सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली. आता शिंदे गटाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यांना सत्तेत येऊन १०० दिवस लोटले. मात्र, तरीही शिंदे गटातील बंडखोर आमदारांना तेव्हा दिलेली वाय दर्जाची सुरक्षा अजूनही कायम आहे. या सुरक्षेसाठी लागणाऱ्या खर्चाचा भार राज्य सरकारच्या तिजोरीवर पडतोय. शिवाय पोलिस यंत्रणेवरही ताण येत असताना ही कोट्यावधींची उधळण कशासाठी असा सवाल उपस्थित केला जात आहे. (MLA Y Security News)

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेतून बाहेर पडलेल्या ४० आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली. त्यामुळे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि आता ऑक्टोबर या महिन्यांच्या १०० दिवसात तब्बल १७ कोटी ९३ लाख रुपयांचा खर्च झाल्याचं सांगितलं जातंय. तीन महिन्यांनंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटातील ४० पैकी ३१ आमदारांची वाय प्लस सुरक्षा कायम आहे. त्यावर राज्यात २० हजार पोलिसांची पदे रिक्त असताना सण-उत्सव काळात तब्बल १,११६ पोलिस कर्मचारी आमदारांच्या दिमतीला आहेत. (Maharashtra News)

राज्यात ३० जूनपासून अस्तित्वात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारमधील ४० आमदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे. यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह ९ जणांची मंत्रिमंडळात वर्णी लागली असल्याने त्यांची ही सुरक्षा कायम आहे. सोबतच अन्य ३१ आमदारांचीही ही सुरक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे जनतेचा पैसा आणि राज्य सरकारची तिजोरी यातून कोट्यावधींची उधळण आमदारांच्या दिमतीसाठी होत आहे.

दरम्यान याबाबत एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच औरंगाबाद येथील खासदार इम्तियाज जलील यांनी शिंदे गटाच्या या आमदारांवर टीकास्त्र सोडलं आहे. जलील म्हणाले की, शिवसनेचे आमदार स्वतःला वाघ म्हणतात, पण वाय दर्जेची सुरक्षा घेऊन फिरणारे हे कसले वाघ आहे. बंडखोरी केल्यावर हे आमदार म्हणाले होते की, आम्हाला कुणाचीच भीती नाही. मग सोबत सात-आठ पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन का फिरतात? त्यांच्यावर आठ ते दहा लाख रुपयांचा खर्च सरकारच्या तिजोरीतून केला जात आहे. त्यामुळे हे पैसे त्यांच्याकडून का वसूल केले जात नाही. त्यामुळे या वाघांची सुरक्षा तात्काळ काढून घ्यावी अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dearness Allowance: मोठी बातमी ! राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना होळीचं गिफ्ट; ८ लाख निवृत्ती वेतनधारकांनाही होणार मोठा आर्थिक फायदा

IND vs ZIM T20 WC: झिम्बाब्वेचा दारूण पराभव; भारत उपांत्य फेरीपासून एक पाऊल दूर; हार्दिक बनला विजयाचा हिरो

रश्मिका मंदाना अन् विजय देवरकोंडा अकडले लग्न बंधनात; कपलची एक कृती ठरली चर्चेचा विषय

Rajya Sabha Election: उद्धव ठाकरे राज्यसभेवर जाणार? मविआमध्ये पडद्यामागे काय घडतेय?

Zilla Parishad: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सदस्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT