महाराष्ट्र सरकारनं शनैश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त केले आहे.
500 कोटींचा भरती घोटाळा आणि बनावट ॲपद्वारे फसवणूक उघडकीस आली.
मंदिराचा कारभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला.
श्री शनैश्वर देवस्थानबाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय.सरकारने शनैश्वर देवस्थानचे ट्रस्ट बरखास्त करण्याचा निर्णय घेतलाय. काही दिवसापूर्वी अनियमता आढळून आली होती. जवळपास 500 कोटी रुपयांचा नोकर भरती घोटाळा अन् आणि बनावट ॲपद्वारे शनिभक्तांच्या फसवणूक प्रकरणी ट्रस्टची चौकशी सुरू आहे.
सरकारनं शनैश्वर देवस्थान बरखास्त केलं असून याचा कारभार जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आलाय. विश्वस्त व्यवस्थेच्या प्रशासक पदावर अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलीय. त्यांच्याकडे मंदिराच्या ट्रस्टचा कारभार सोपवण्यात आलाय. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांची विश्वस्त व्यवस्थेच्या प्रशासक पदावरील नियुक्ती विश्वस्त व्यवस्था व्यवस्थापन समिती गठीत होईपर्यंत असणार आहे.
काही दिवसापूर्वी देवस्थानमधील आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहारासोबत तब्बल ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून वाद झाला होता. इतकेच नाही तर हे प्रकरण विधीमंडळातही चर्चेला आले होते. तसेच बनावट अॅपद्वारे भाविकांची लूटप्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा दाखल करणार असल्याचं म्हटलं होतं.
आता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणात तपास करताना पोलिसांना पाच बनावट अॅपच्या लिंक मिळून आल्या आहेत. चालक-मालक आणि त्यांच्या इतर साथीदारांविरोधात ही गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय.
अहिल्यानगरमधील सायबर पोलीस ठाण्यात शनैश्वर देवस्थानचे मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी भाविकांची बनावट दर्शन अॅपद्वारे फसवणूक होत असल्याची तक्रार चार जून दिली होती. अशीच तक्रार आणखी दोघांनी देखील दिली होती. सायबर पोलिसांकडून या अर्जांची तक्रारीनुसार प्राथमिक चौकशी केली. यात तथ्य आढळलं. यानुसार शनैश्वर देवस्थानला संपर्क साधून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.