Ekal Mahila Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Government: आता विधवांना संबोधलं जाईल 'एकल महिला', महाराष्ट्र सरकारची नवी योजना

Ekal Mahila Yojana: महाराष्ट्र सरकारने विधवा महिलांसाठी मोठा निर्णय घेतला. एकल महिला योजना ही सरकारे नवी योजना सुरू केली आहे.

Priya More
  • महाराष्ट्र सरकारने ‘विधवा’ ऐवजी ‘एकल महिला’ ही संज्ञा स्वीकारली

  • ५० ते ५५ लाख महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार होत आहे

  • धोरणाचा भर सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरणावर

  • २३ जून रोजी राज्यभर ‘एकल महिला दिन’ साजरा करण्यात आला

एकल महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी व्यापक धोरण राबवण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. राज्यातील अंदाजे ५० ते ५५ लाख एकल महिलांसाठी स्वतंत्र व व्यापक धोरण राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या महिलांच्या हितसंवर्धनाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. मुंबईत एकल महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत महिलांशी संवाद साधत असताना त्यांनी ही माहिती दिली.

संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय विधवा दिनाऐवजी महाराष्ट्र सरकारने 'एकल महिला दिन' साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, २३ जून रोजी राज्यभरामध्ये एकल महिला दिन साजरा करण्यात आला. राज्यातील एकल महिलांच्या समस्या, गरजा आणि हक्क यावर केंद्रित स्वतंत्र धोरण तयार करण्यासाठी महिला व बाल विकास विभाग सक्रियपणे कार्य करत आहे, असे देखील आदिती तटकरे यांनी सांगितले.

महिला व बाल विकास विभाग मुंबई शहर यांच्या वतीने आयोजित एकल महिला दिवस आणि एकल महिला धोरणाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदिती तटकरे यांनी उपस्थिती लावली. एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांच्या हक्क आणि कल्याणासंबंधी विविध विषयांवर आयोजित या कार्यशाळांमध्ये नागरिक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि तज्ज्ञांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांना अभिवादन करून राज्यभरामध्ये एकल महिलांच्या सन्मान आणि सक्षमीकरणासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईसह पुणे, रत्नागिरी, गडचिरोली, अकोले यासह अनेक ठिकाणी महिला एकल दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक महिलांनी उपस्थिती लावत चांगला प्रतिसाद दिला.

२३ जून रोजी आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतीमध्ये एकल महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र सरकारमार्फत राज्याचे एकल महिला धोरण तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानिमित्ताने २३ जूनला एकल महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये 'विधवा' या शब्दाऐवजी 'एकल महिला' ही संज्ञा वापरून गाव आणि शहरातील सर्व एकल महिलांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT