Aditi Tatkare
Aditi TatkareSaam Tv

Aditi Tatkare: पूरग्रस्त भागातील 'लाडकी'साठी आदिती तटकरेंचा मोठा निर्णय, पालकमंत्र्यांना केली विनंती

Aditi Tatkare Help Women Affected Due To Flood: सोलापूर, धाराशीव, लातूर, बीड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढला आहे. या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, या भागातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स देण्यासाठी आदिती तटकरेंनी निर्णय घेतला आहे.
Published on

राज्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. धाराशीव, सोलापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यांना पुराचा खूप जास्त फटका बसला आहे. अनेकांची घरे उद्धवस्त झाली आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. त्यांना अनेक गोष्टींची मदत केली जात आहे. दरम्यान, महिलांसाठी काही उपयोगाच्या वस्तू उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. याबाबत महिला व बालविकास अधिकारी आदिती तटकरेंनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Aditi Tatkare
Dharashiv Flood: धाराशिवमध्ये पावसाचा हाहाकार, भीषण पूरस्थिती; मात्र जिल्हाधिकारी डान्स करण्यात दंग; पाहा VIDEO

आदिती तटकरे यांनी पुरग्रस्त भागातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करुन देण्यास सांगितले आहे. याबाबत त्यांनी पालकत्र्यांना विनंतीदेखील केली आहे. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

आदिती तटकरे काय म्हणाल्या?

पूरग्रस्त भागातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स प्राधान्याने उपलब्ध करून द्यावेत. बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, हिंगोली, जालना, परभणी, जळगाव, बुलढाणा, अहिल्यानगर जिल्ह्यांतील बहुतांश भाग अतिवृष्टीने बाधित आहे. या संकटकाळात महिलांच्या आरोग्य व स्वच्छतेसाठी आवश्यक सुविधा पुरवणे अत्यंत गरजेचे आहे. ही बाब विचारात घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या ३% महिला व बालकल्याण निधीतून पूरग्रस्त भागातील महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्री महोदयांना विनंती केली आहे. पूरग्रस्त भागातील महिलांच्या आरोग्यासाठी या विनंतीचा सकारात्मक विचार होऊन लवकरात लवकर कार्यवाही होईल हा मला विश्वास आहे.

Aditi Tatkare
Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

महिलांच्या आरोग्याची काळजी म्हणून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महिलांपर्यंत त्यांच्या उपयोगाच्या वस्तू पोहचणार आहे. याचसोबत अनेक ठिकाणांहून मदतदेखील पाठवली जाते. अन्न-धान्य, रोजच्या वापराच्या वस्तू, औषधे, आर्थिक मदत दिली जाते.

Aditi Tatkare
Aditi Rao Hydari Skin Care: ३८ वर्षांच्या आदिती राव हैदरीच्या ग्लोइंग स्किनचं सिक्रेट काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com