Gopichand Padalkar Saam TV
महाराष्ट्र

Dhangar Reservation: 'धनगर आरक्षणाला मुठभर आदिवासींचा विरोध..' आमदार गोपीचंद पडळकर

Wardha News: भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर जागर यात्रेला सुरूवात केली असून धनगर आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Gangappa Pujari

चेतन व्यास, प्रतिनिधी

Gopichand Padalkar News:

एकीकडे राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी लढा उभारलेला असतानाच आरक्षणाच्या मागणीवरुन धनगर समाजही आक्रमक झाला आहे. भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर जागर यात्रेला सुरूवात केली असून धनगर आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

आमदार गोपीचंद पडळकर यांची वर्ध्यातील देवळी येथे धनगर जागर यात्रा सभा झाली. यावेळी बोलताना पडळकर यांनी धनगर आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. "धनगर आरक्षणाला आदिवासींचा विरोध नाही. आदिवासीच्या 33 जमाती धनगर आरक्षणाच्या बाजूने आहेत. मात्र मुठभर लोक या आरक्षणाच्या विरोधात आहेत," असे पडळकर म्हणाले.

तसेच पुढे बोलताना "आदिवासी समाजाचे नव्वद टक्के लोक आहेत ज्यांना एसटीचा दाखलाच मिळाला नाही. त्यातील 33 आदिवासी अन्यायग्रस्त जमातीला धनगर जागर यात्रा झाल्यानंतर आदिवासी जमातीला एसटीचा दाखला मिळवून देण्यासाठी संकल्प अभियान राबवणार" असल्याचेही त्यांनी सांगितले.

सरकार आरक्षणासाठी सकारात्मक...

दरम्यान, यावेळी गोपीचंद पडळकर यांनी धनगर जागर यात्रेत उपस्थित समाज बांधवाना धनगर आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असल्याची माहिती दिली. सोबतच हा यात्रेचा पहिला टप्पा संपल्यानंतर तालुका स्तरावर धनगर समजबांधवांचे मेळावे घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aishwarya Narkar: निळ्या साडीतील ऐश्वर्याचं सौंदर्य पाहून म्हणाल स्वप्नसुंदरी...

Sangli Politics: मुख्यमंत्रीपदासाठी जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा, सदाभाऊ खोतांनी उडवली खिल्ली, म्हणाले...

Nashik MNS : नाशिकमध्ये मनसेला आणखी एक धक्का; माजी जिल्हाध्यक्षांचा भाजप उमेदवाराला पाठिंबा

Nora Fatehi: चुराके दिल मेरा गोरिया चली, नोराचं सुंदर सौंदर्य

Cyber Crime : इंटरनेटवर संपर्क क्रमांक शोधणे पडले महागात; दहा लाखात ऑनलाईन फसवणूक

SCROLL FOR NEXT