मुंबई : राज्य शासनाने आज मध्यरात्रीपासून लागू केलेल्या निर्बंधापैकी काही निर्बंध शिथील केले आहेत. काहींना दुकान आणि सेवा ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याची सवलत दिली आहे. यामध्ये जिम, सलून आदींचा समावेश आहे. (maharashtra government permits gym saloon and beauty saloon to remain open following covid19 guideliness)
काेविड १९ चा (covid19) वाढता प्रादुर्भाव राेखण्यासाठी राज्य (maharashtra) सरकराने आज मध्यरात्रीपासून निर्बंध लावले हाेते. दरम्यान आज (रविवार) महाराष्ट्र सरकारने शनिवारी काढलेल्या आदेशात काही गाेष्टींबाबतीत सुधारणा केली आहे. त्यामुळे युवकांसह युवती, महिला वर्ग खूष हाेणार असे म्हटलं जात आहे.
सुधारित नियमावलीत हेअर कटिंग सलूनसह, ब्युटी पार्लरला ५० क्षमतेने सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. याबराेबर व्यायामशाळा (जिम) ५० क्षमतेने खूल्या ठेवता येतील. ज्या नागरिकांचे पूर्ण लसीकरण झालेले आहे अशांनाच सेवा वापरण्याची मुभा राहील असेही शासनाने स्पष्ट केले आहे.
edited by : siddharth latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.