नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी आज रविवार NEET-PG समुपदेशन (NEET-PG counselling) येत्या १२ जानेवारीपासून सुरू होईल अशी घाेषणा केली आहे. Neet बाबत मांडविया यांनी ट्विट केले आहे. (union health minister mansukh mandaviya announces neet pg counselling to begin on january 12)
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अखिल भारतीय कोट्यातील जागांवर सध्याच्या २७ टक्के ओबीसी आणि १० टक्के ईडब्ल्यूएस (EWS) आरक्षणांवर आधारित रखडलेली NEET-PG 2021 समुपदेशन प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया तातडीने सुरु करण्याची गरजेची हाेती. त्या अनुषंगाने केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी कार्यवाही केली आहे.
फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनला (FORDA) सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय दिलासादायक ठरला. NEET-PG समुपदेशन सुरू करण्यात विलंब झाल्याबद्दल सर्वत्र निषेध व्यक्त केला जात हाेता. तसेच प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची गरज असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
edited by : siddharth latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.