MAHARASHTRA REVENUE LOK ADALAT saam tv
महाराष्ट्र

7/12 चे वाद मिटणार, जमिनीचे तंटे कोर्टाबाहेर सुटणार

Maharashtra Revenue Lok Adalat campaign: राज्यात अनेक ठिकाणी शेतजमिनीच्या वादातून वाद आणि प्रसंगी हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, आता महसूल विभाग नवं अभियान राबवणार आहे. या अभियानाचा नेमका उद्देश्य काय आहे? सरकारच्या या नवीन अभियानाचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

Rohit Kadam

शेतजमीन आणि जमिनीवरून हाणामाऱ्या, वाद, तंटे, कोर्ट कचेरी हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात वर्षानुवर्ष सुरूय...मात्र हे वर्षानुवर्षे प्रलंबित जमिनींचे खटले लवकरच निकाली निघण्याची शक्यता आहे. प्रलंबित जमिनी आणि महसुली वाद आता परस्पर संमतीनं निकाली काढण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न सुरू केले आहेत. सरकारनं राज्यभरात 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान' सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. या अभियानांतर्गत आता अनेक प्रकरणं कोर्टाबाहेरच मिटवण्यात येणार आहेत. राज्यातील नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचवणाऱ्या 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत अभियाना'चं स्वरुप नेमकं कसं असणार आहे ते पाहूयात....

जमिनीचे वाद कोर्टाबाहेरच मिटणार!

- प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असणारे जमिनीचे वाद आता कोर्टाबाहेरच मिटणार

- राज्य सरकारतर्फे 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान'

- 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027दरम्यान संपूर्ण राज्यभर राबवणार

- मंडल अधिकारी ते अपर जिल्हाधिकाऱ्यांकडील अर्धन्यायिक दावे तडजोडीनं निकाली निघणार

- महसूल न्यायालयांच्या फेऱ्या मारणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा

राज्यातील हजारो जमिनींचे वाद कोर्टाविना सोडवण्यासाठी महसूल विभागानं मोठं पाऊल उचललंय. राज्यात अनेक जमिनी एका व्यक्तीच्या नावावर असल्या तरी, प्रत्यक्षात ताबा दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर असल्याचं समोर आलंय. अशा प्रकरणांत दोघांचीही समंती आवश्यक असल्यानं जमिनीचा वाद थेट कोर्ट-कचेरीपर्यंत जातो. तर दुसरीकडे, जमिनीच्या वाढत्या किमतींसोबतच जमिनीशी संबंधित महसुली वादांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढलीये. त्यामुळे छोट्या-छोट्या वादांमुळे शेतकरी व सामान्य नागरिकांना सरकार आणि कोर्टाची पायरी चढावी लागते. आणि या सगळ्यात त्यांचा पैसा आणि वेळ दोन्ही वाया जातो. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या नियोजित अभियानाला राज्यभरातून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओबीसी आरक्षित सरपंच पदांच्या संख्येत घट, जातीमुळे ओबीसींचं सरपंच पद हुकणार

VIRAL VIDEO : पायातली चप्पल हरवली, पठ्ठ्याच्या डोक्यात ट्यूब पेटली; हजारोंच्या ढिगाऱ्यातून ChatGPT ने शोधून काढली, कशी? पाहा व्हायरल व्हिडिओ

लातूरमध्ये अंधश्रद्धेच्या पैशांचा पाऊस, 20 कोटींच्या आमिषानं अघोरी कृत्य

Crime News : २ मिनिटांच्या रागानं ४ वर्षांचा सुखी संसार उद्ध्वस्त; मारहाणीत पत्नीनं सोडला जीव, घाबरून पतीनंही मृत्यूला कवटाळलं

CJPनंतर आता 'दिमागी नक्षल पार्टी, मोदींच्या विधानानंतर तरुणाईत पुन्हा रोष?

SCROLL FOR NEXT