Fact-Check Ladki Bahin Yojana  x
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: 18 नोव्हेंबरनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार? खर्च सरकारला परवडेना? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Fact-Check Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना आता बंद होणार आहे, हे ऐकून लाडकींना नक्कीच धक्का बसेल. कारण, सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होतोय. लाडकी बहीण योजना 18 नोव्हेंबरनंतर बंद करणार असल्याचा दावा केलाय.पण, खरंच ही योजना बंद होणार आहे का? याची आम्ही पडताळणी केली, त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

Sandeep Chavan

  • वेबसाईटमधील बदलामुळे पैसे मिळण्यास वेळ लागतोय

  • लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

  • e-KYC पडताळणी अनिवार्य करण्यात आलीय

लाडकी योजना 18 नोव्हेंबरनंतर बंद होणार असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय.राज्यात दीड कोटीपेक्षा लाडकी योजनेच्या लाभार्थी आहेत. हा मेसेज व्हायरल होत असल्याने अनेक लाडकींना धक्का बसलाय. मात्र, खरंच लाडकी योजना बंद होणार आहे का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण, राज्यात दीड कोटीपेक्षा जास्त महिला लाभार्थी असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज

18 नोव्हेंबरनंतर लाडकी बहीण योजना लवकरच बंद होणार आहे. सरकारला लाडकीचा खर्च परवडत नाहीये. हा दावा करण्यात आलाय. त्यामुळे अनेकांना यावर विश्वास बसतोय. कारण, ग्रामीण भागात अनेक लाडकींची ईकेवायसी झालेली नाही. त्यामुळे अनुदान मिळण्यास उशीर होत आहे. ईकेवायसी करण्यासाठी सरकारची वेबसाईट आहे.

त्यासाठी अधिकृत वेबसाइट https://ladakibahin.maharashtra.gov.in देण्यात आलीय. यासाईटवरून ईकेवायसी करू शकता. मात्र, ही योजना बंद होणार आहे का? याची माहिती मिळवली. तसंच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनीच लाडकी बद्दल माहिती दिलीय. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य/ साम इन्व्हिस्टिगेशन

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

e-KYC पडताळणी अनिवार्य करण्यात आलीय

e-KYC प्रक्रियेसाठी लाभार्थ्यांना 2 महिन्यांचा वेळ

e-KYC केलेल्यांचा लाभ थांबवला जाणार नाही

वेबसाईटमधील बदलामुळे पैसे मिळण्यास वेळ लागतोय

लाडकी बहिणींच्या वेबसाईटमध्ये बदल केले जातायत.ज्या महिलेच्या पतीचं निधन झालं असेल त्यांच्या डेथ सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी वेबसाईटमध्ये बदल केला जातोय. यामुळे अनुदान मिळण्यास वेळ लागतोय.मात्र, लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates: बिहारमध्ये भाजप प्रणित NDA ला यश, महाराष्ट्रातील नागपुरात जल्लोष

Maharashtra Live News Update: जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीला आग

Celebrity in Drug Case: २५२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपीने घेतलं श्रद्धा कपूर, नोरा फतेहीचं नावं; संपूर्ण प्रकरण नेमकं काय?

Diabetes Patients Breakfast: डायबेटीजच्या रूग्णांनी नाश्ता कधी करावा? तज्ज्ञ सांगतात 'या' वेळेत खा, कंट्रोलमध्ये राहिल ब्लड शुगर

Pune Accident News : पुण्यात अपघाताचे सत्र सुरूच; देवदर्शनाला निघालेल्या भाविकांची पिकअप उलटली, १७ जखमी

SCROLL FOR NEXT