ST bus service Saam tv
महाराष्ट्र

ST Fare Hike : एसटी बसच्या तिकिट दरात मोठी वाढ, दिवाळीआधी सर्वसामान्यांना झटका

Increases ST Bus Ticket Prices : सर्व सामान्यांसाठी हक्काची असेलल्या लालपरी म्हणजेच एसटीच्या दरात वाढ करण्याचा घेण्यात आला आहे. दिवाळीसाठी एसटीच्या तिकिट दरामध्ये दहा रूपयांनी वाढ केली आहे.

Namdeo Kumbhar

MSRTC increases ticket prices by 10% during festive season : सणासुदीच्या काळात सर्व सामान्यांना महागाईचा चटका बसणार आहे. आधीच पूरस्थितीने होरपाळलेल्या नागरिकांना आता एसटीच्या दरवाढीचा चटका बसणार आहे. सर्व सामान्यांसाठी हक्काची असेलल्या लालपरी म्हणजेच एसटीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही दरवाढ दिवाळीसाठी असून एसटीच्या तिकिट दरामध्ये दहा टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरात कामासाठी गेलेले चाकरमान्यांना दिवळीला घरी जाताना जास्तीचे शुल्क द्यावे लागणार आहे. (ST bus fare hike in Maharashtra in Diwali 2025)

महाराष्ट्र परिवहन महामंडळाने एसटीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. दिवाळीत प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे दरवाढीचा एसटीला मोठा आर्थिक फायदा होणार आहे. १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या काळात एसटीच्या तिकिट दरात १० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, जानेवारी २०२५ मध्ये एसटी महामंडळाने १४.९५ टक्के भाडेवाढ लागू केली होती. हे दर एस टीच्या सर्व सेवांसाठी लागू करण्यात आले होते.आता पुन्हा दिवाळीत एसटीचे दर वाढवल्यामुळे सर्वसामान्यांचा खिसा रिकामा होणार आहे.

एसटी महामंडळाच्या सर्व बसेसाठी ही १० टक्क्यांची दरवाढ नाही. शिवनेरी आणि शिवाई या दोन बसेससाठी जुनेच तिकिटाचे दर असतील. शिवशाही, शिवनेरीसह इतर एसटी बसेसाठी दिवळीत १० टक्के दरवाढ लागू करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयाचा फटका राज्यातील सर्वसामान्यांना बसणार आहे. आधीच पावसामुळे होत्याचे नव्हते झालेय. दिवाळी कशी साजरी करायची? हे संकट उभे राहिलेय, त्यात आता एसटीची दरवाढ करण्यात आली आहे. दिवाळीच्या काळात आता एसटी प्रवासासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे.

एसटी महामंडळाने दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना, विशेषतः दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना दिवाळीत अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. सणासुदीच्या काळात एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे एसटीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढेल, असा या दरवाढीमागे हेतू असल्याचे सूत्रांनी सांगितले. पण या दरवाढीमुळे सामान्य प्रवाशांचा खिसा मात्र रिकामा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhayandar Tourism : वीकेंडचा प्लान ठरला; भाईंदरमध्ये लपलाय सुंदर किनारा, पाहताच मनाला भुरळ पडेल

Kristina Coco: तर मी कबूल करते की मी वेश्या आहे...; व्हायरल झालेल्या रशियन मुलीला अश्रू अनावर

Rain Alert : पुढील ५ दिवस अत्यंत महत्वाचे, महाराष्ट्रासह १५ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Live News Update: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार

भारतातील सर्वात महागड्या चित्राचा लिलाव, वी.एस. गायतोंडे यांच्या कलेला मिळाले 67.08 कोटी रुपये, VIDEO

SCROLL FOR NEXT