AHERI WOMEN AND CHILD HOSPITAL HIT BY MASS RESIGNATION OF FIVE DOCTORS IN GADCHIROLI Saam tv
महाराष्ट्र

Doctor Resign : सरकारी रुग्णालयातील ५ डॉक्टरांचे एकाचवेळी राजीनामे; गडचिरोलीच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

Gadchiroli Hospital Doctor Resign : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील नव्याने सुरू झालेल्या महिला व बाल रुग्णालयातील पाच डॉक्टरांनी एकाचवेळी राजीनामे दिल्याने खळबळ उडाली आहे.

Alisha Khedekar

  • अहेरी महिला व बाल रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

  • पाच डॉक्टरांनी एकाचवेळी राजीनामे दिले

  • राजीनाम्यांमागील कारण अद्याप अस्पष्ट

  • रुग्णांवर याचा परिणाम होण्याची शक्यता

Gadchiroli 5 Doctor Resign वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील नव्याने सुरू करण्यात आलेल्या महिला व बाल रुग्णालयाला मोठा धक्का बसला आहे. रुग्णालयातील पाच डॉक्टरांनी अचानक एकाच वेळी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. राजीनाम्यांमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोलीतील जिल्ह्यातील अहेरी येथे महिला व बालकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने अत्याधुनिक सुविधा असलेले महिला व बाल रुग्णालय सुरू करण्यात आले. मात्र रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होण्यापूर्वीच पाच डॉक्टरांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रशासकीय ताण, अपुऱ्या सुविधा, मनुष्यबळाचा अभाव किंवा अन्य अंतर्गत कारणांमुळे डॉक्टरांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. अहेरीसह भामरागड, एटापल्ली आणि सिरोंचा या दुर्गम भागातील हजारो महिला व बालकांसाठी हे रुग्णालय महत्त्वाचे ठरणार होते. मात्र डॉक्टरांच्या राजीनाम्यांमुळे नागरिकांना पुन्हा उपचारासाठी जिल्हा मुख्यालय किंवा खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राजीनाम्यांमागील कारणांची सखोल चौकशी करून रिक्त पदांवर तातडीने नियुक्त्या कराव्यात, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरत आहे.दरम्यान एखादा प्रसंग ओढवल्यास तातडीने रुग्णांनी नेमकं जायचं कुठे? हा मोठा प्रश्न आता नागरिकांसमोर उभा राहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Glowing Skin Tips: फ्रिजमधील या ४ गोष्टींनी परत मिळवा त्वचेचा हरवलेला ग्लो; जाणून घ्या ७ सोपे उपाय

काळजाचा थरकाप! जेजुरीत खेळता खेळता दीड वर्षाच्या चिमुकला अचानक गायब झाला, सगळीकडे शोधाशोध, सेफ्टी टँककडे नजर जाताच पालकांना...

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये ठाकरे सेनेचे रामरक्षा आंदोलन

KDMC डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन रद्द; पोलिसांसमोर सरेंडर होणार

World's first website: इंटरनेटवरील सर्वात पहिली वेबसाईट कोणती होती?

SCROLL FOR NEXT