Sugar Factories Saam tv News
महाराष्ट्र

Sugar Factories: सहकारी साखर कारखान्यांसाठी खुशखबर, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; १३ सदस्यांची समिती स्थापन

Maharashtra Government: महाराष्ट्र सरकारने राज्यातील सहकारी साखर कारखान्यांबाबत मोठा निर्णय घेतला. कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी १३ सदस्यांची समिती स्थापन केली आहे.

Priya More

महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांसाठी खुशखबर आहे. फडणवीस सरकारने सहकारी साखर कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी मोठा निर्णय घेतला आहे. सहकारी साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने समिती गठीत केली आहे. साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली फडणवीस सरकारने १३ सदस्यीय समिती स्थापन करण्यास मंजुरी दिली. राज्यातील सहकारी साखर कारखाने सुरू राहावेत यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

राज्यातील सहकारी साखर कारखाने सुरू राहावेत यासाठी सहकार विभाग आणि राज्य सहकारी बँकेकडून संयुक्त अभ्यास करण्यात येणार आहे. सरकारने स्थापन केलेली १३ सदस्यांची समिती राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची सद्यस्थिती, आर्थिक अडचणी आणि कारखाने बंद पडण्यामागील कारणांचा या सखोल अभ्यास करणार आहे. या समितीमध्ये सहकार आयुक्त, राज्य सहकारी बँक, रिझर्व्ह बँक, नाबार्ड, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तसेच सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे.

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या आर्थिक सक्षमीकरणावर फडणवीस सरकारकडून भर दिला जाणार आहे. ऊस उत्पादकता आणि साखर उतारा वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत शिफारशी करण्यात आल्या आहेत. ऊस शेतीमध्ये एआय, जीपीएस, ड्रोन आणि ठिबक सिंचनाचा वापर वाढवण्यावर देखील भर दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ऊस बियाणे, मृदा आरोग्य, पीक फेरपालट आणि ऊस विकास कार्यक्रमाचा अभ्यास या समितीद्वारे केला जाणार आहे. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना ऊर्जा संकुल म्हणून विकसित करण्यासाठी समितीच्या माध्यमातून आराखडा तयार केला जाणार आहे. दोन महिन्यांत शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या समितीने २ महिन्यांच्या आत सविस्तर अहवाल आणि शिफारशी शासनाला सादर कराव्यात असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

सरकारने स्थापन केलेली १३ सदस्यांची समिती नेमका काय अभ्यास करणार?

साखर उद्योगातून अतिरिक्त उत्पन्नाचे नवे पर्याय -

- सीबीजी, इथेनॉल, मल्टी-फीड डिस्टिलरी, शाश्वत विमान इंधन निर्मितीला प्रोत्साहन दिले जाणार.

- सहवीज निर्मिती, सौर ऊर्जा, हरित हायड्रोजन आणि जैव-रसायन निर्मितीवर भर दिला जाईल.

- १० उपपदार्थांच्या निर्मितीसाठी एकात्मिक बायो-रिफायनरी अर्थात झिरो वेस्ट मॉडेल तयार करण्याचा विचार असेल.

- यासाठी केंद्र सरकार २० टक्के, राज्य सरकार १० टक्के आणि कारखान्यांचा ७० टक्के आर्थिक सहभाग या प्रस्तावित आर्थिक प्रारूपाची व्यवहार्यता तपासली जाणार आहे.

अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना पुनरुज्जीवनाचा आधार -

- प्रत्येक कारखान्याची स्वतंत्र आर्थिक व्यवहार्यता तपासली जाणार आहे.

- हंगामनिहाय स्वतंत्र कॅश क्रेडिट कर्ज खाते आणि कर्ज परतफेडीचे धोरण निश्चित होणार आहे.

- आर्थिक अडचणीत असलेल्या एनपीए कारखान्यांसाठी रिझर्व्ह बँकेच्या मदतीने पुनरुज्जीवन आणि कर्जनिराकरण आराखडा तयार होणार आहे.

- बाह्य गुंतवणूकदारांचा सहभाग, पुनरुज्जीवन निधी आणि एनसीडीसीमार्फत भांडवली सहाय्याबाबत धोरण निश्चित करण्याचा अभ्यास केला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रिक्षा टॅक्सी चालक-मालक सेनेची पार्श्वभूमी सांगत प्रताप सरनाईक यांची भूमिका

१०० व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे; पुण्यात होणार शतकमहोत्सवी संमेलन

Salt Vastu Tips: तुमच्या किचनमध्ये मीठ कोणत्या दिशेला ठेवलंय? वास्तूशास्त्रात सांगितलीये योग्य दिशा

Pashudhan Yojana: शेळीपालन, दुग्धव्यवसायासाठी सरकारी अनुदान! पशुधन योजनेचा अर्ज 26 नोव्हेंबरपासून सुरू; आधीच तयार ठेवा ही 8 कागदपत्रे

Railway Safety : रेल्वे स्टेशनवर पिवळ्या उंचवट्याच्या फरशा का लावतात? कारण जाणून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT