Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Mahayuti Government : भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची नावे समोर; लॉटरी कुणाला लागणार?

Maharashtra Government Formation : महायुतीतील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य मंत्र्यांची नावे समोर आली आहेत. यावेळी कुणाला लॉटरी लागणार आणि कुणाचा पत्ता कट होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Nandkumar Joshi

गणेश कवडे/वैदेही काणेकर

महायुती सरकारचा मुख्यमंत्री कोण असणार हे अद्याप गुलदस्त्यात असतानाच, महायुतीमधील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांची यादी आली आहे. नव्या चेहऱ्यांना संधी आणि अडचणीत टाकणाऱ्या मंत्र्यांना यावेळी डच्चू दिला जाण्याची शक्यता असल्यामुळं अनेकांची धाकधूक वाढली आहे. त्यात आता मंत्रि‍पदाची लॉटरी कुणाला लागू शकते, अशी संभाव्य नावे समोर आली आहेत. सूत्रांकडून ही माहिती मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीत मतदारराजानं महायुतीच्या बाजूने स्पष्ट कौल दिला. भाजपनं १३२ जागा जिंकल्या. तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेनं ५७ जागांवर विजयाचा झेंडा रोवला. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंही जोरदार मुसंडी मारत ४१ जागांवर विजय मिळवला. आता राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार हे जरी जवळपास निश्चित झालं असलं तरी, अद्याप नाव जाहीर झालेलं नाही.

सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपकडे मुख्यमंत्रिपद राहणार आहे, हे आता निश्चित झालं आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीसांचं नाव आघाडीवर असल्याचं सांगण्यात येत असलं तरी, जोपर्यंत नाव जाहीर होत नाही, तोपर्यंत भाजप कोणतं धक्कातंत्र अवलंबणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.

येत्या ५ डिसेंबरला राज्यातील नव्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मुंबईतील आझाद मैदानात हा भव्य सोहळा होणार असल्याची माहिती महायुतीच्या नेत्यांकडून दिली जात आहे. या सोहळ्याची जय्यत तयारीही सुरू झाली आहे. भाजपच्या काही नेत्यांकडून मैदानाची पाहणी देखील झाली आहे. आता मुख्यमंत्रिपदाची शपथ कोण घेणार, याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्रवासियांसह देशाला लागली आहे. तत्पूर्वी, महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांमध्ये कोणत्या नेत्याला मंत्रिपदाची लॉटरी लागणार, ती संभाव्य नावे समोर आलेली आहेत.

शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी

एकनाथ शिंदे

दादा भुसे

शंभुराज देसाई

गुलाबराव पाटील

अर्जुन खोतकर

संजय राठोड

उदय सामंत

भाजपचे संभाव्य मंत्री

कोकण

रविंद्र चव्हाण

नितेश राणे

गणेश नाईक

मुंबई

मंगलप्रभात लोढा

आशिष शेलार

अतुल भातखळकर

पश्चिम महाराष्ट्र

शिवेंद्रसिंहराजे भोसले

गोपीचंद पडळकर

माधुरी मिसाळ

राधाकृष्ण विखे पाटील

राहुल कुल

विदर्भ

चंद्रशेखर बावनकुळे

सुधीर मुनगंनटीवार

संजय कुटे

राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य नावे

अजित पवार

आदिती तटकरे

छगन भुजबळ

दत्ता भरणे

धनंजय मुंडे

अनिल भाईदास पाटील

नरहरी झिरवळ

संजय बनसोडे

इंद्रनिल नाईक

मकरंद पाटील

उत्तर महाराष्ट्र

राहुल ढिकले

गिरीश महाजन

जयकुमार रावल

मेघना बोर्डीकर

मराठवाडा

पंकजा मुंडे

अतुल सावे

राणा जगजीतसिंह पाटील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Maharashtra Live News Update: - सोलापूर जिल्ह्यात माढा येथे सर्वाधिक पुरस्थिती

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्यांसह ८०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Pune Crime News : दिवसा खासगी बँकेत नोकरी, रात्री करायचा भयंकर खेळ; पुण्यातील तरुणासह ३९ जण अडकले

SCROLL FOR NEXT