Maharashtra government employee salary payment EMDb certificate saam tv
महाराष्ट्र

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगारासंदर्भात सरकारचा नवा आदेश; 'ही' काम करा नाहीतर अडकेल पगार

Government Employees : महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष (EMDb) अद्ययावत केला जात आहे. कर्मचाऱ्यांची आवश्यक माहिती ऑनलाइन भरावी लागणार आहे.

Bharat Jadhav

  • शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष २०२६ अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

  • कर्मचाऱ्यांची सेवा व वैयक्तिक माहिती ऑनलाइन पद्धतीने संकलित केली जात आहे.

  • कर्मचाऱ्यांनी आपली माहिती अचूक भरून संबंधित कार्यालयाच्या सूचनांनुसार प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.

शासकीय नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारनं कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात मोठा निर्णय घेतलाय. कर्मचाऱ्यांना आपली सर्व माहिती ऑनलाइन भरावी लागणार आहे. अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाने 'शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष' अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू केलीय. नियमित, नियमिततेतर आस्थापना, कार्यव्ययी आस्थापना, रोजंदारी, अंशकालीन आणि मानसेवी कर्मचाऱ्यांची माहिती भरावी लागणार आहे. कर्मचाऱ्यांनी ही माहिती वेळेत भरली नाही तर संबंधित कर्मचाऱ्यांचा पगारही अडकण्याची शक्यता आहे.

कोणती माहिती द्यावी लागणार?

या माहितीकोषात कर्मचाऱ्याचा सेवार्थ आयडी, नाव, जन्मदिनांक, लिंग, पदनाम, सेवेत रुजू व निवृत्तीची तारीख, भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक, पॅन, आधार, मोबाइल, ई-मेल, सामाजिक प्रवर्ग, जात, धर्म, स्वग्राम आणि दिव्यांगत्व आदी माहिती द्यावी लागेल. कर्मचाऱ्याचे सध्याचे पद, पदोन्नतीची तारीख आणि जुलै २०२६मधील संपूर्ण वेतनाची तपशीलवार माहितीही नोंदवावी लागेल. या माहितीमुळे शासकीय मनुष्यबळाची अचूक संख्या, रिक्त पदांची स्थिती व वेतनावरील खर्चाचे चित्र स्पष्ट होईल.

कधी नोंदवावी लागेल माहिती?

२ ते १५ सप्टेंबर २०२६ दरम्यान ऑनलाइन प्रणालीचा लॉग-इन आयडी व पासवर्ड मिळेल. १५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत माहिती भरून पहिले प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहेत. त्रुटी दुरुस्तीसाठी १ डिसेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर दुसरे प्रमाणपत्र मिळणार आहे.

प्रमाणपत्र बंधनकारक; त्याशिवाय पगार नाही

नोव्हेंबर २०२६ चे वेतन बिल सादर करताना पहिले प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. फेब्रुवारी २०२७ चे वेतन बिल (मार्चमध्ये देय) सादर करतानाही दुसरे प्रमाणपत्र आवश्यक असेल. कोषागारात वेतन बिले सादर न करणाऱ्या कार्यालयांनाही कर्मचारी आणि रिक्त पदांची माहिती ऑनलाइन भरावी लागेल. १ जुलै २०२६ रोजी सेवेत असलेले आणि जुलैमध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतलेले कर्मचारीही यात समाविष्ट केले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वसतिगृहासाठी नंदुरबारमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा 20 किलोमीटरपर्यंत मोर्चा

Namo Shetkari Yojana : दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५००० येणार! नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Grey Colour Saree Designs For Women: नवरात्रीसाठी ग्रे कलरच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन, महिलांनी नक्की ट्राय करा हे 5 पॅटर्न्स

Vijay Khairnar : मालेगावच्या चिमुकलीला अखेर न्याय! आरोपी विजय खैरनारला फाशीची शिक्षा

Morning Routine: सकाळच्या या १० सवयी लावून घ्या, दिवसभर राहाल ताजेतवाने...

SCROLL FOR NEXT