Maharashtra Government Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Government: रस्त्यांना मिळणार विशिष्ट नंबर, रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Government Decision: ग्रामीण भागातील रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता रस्त्यांना एक विशिष्ट नंबर दिला जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक रस्ता अतिक्रमणमुक्त केला जाणार आहे.

Siddhi Hande

ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

ग्रामीण भागात रस्ते, गाडीमार्ग, पायमार्ग आणि शेतरस्त्यांचे सीमांकन करणार

ग्रामीण रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मोठा निर्णय

गणेश कवडे, साम टीव्ही प्रतिनिधी

ग्रामीण भागात रस्त्यांची खूपच जास्त प्रमाणात दुरावस्था दिसते. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. याचसोबत रस्त्याच्या बाजूला असलेल्या अतिक्रमणांमुळे रस्त्यांवरुन जाणेदेखील अवघड होते. या समस्यावेर तोडगा काढण्यात आला आहे. आता ग्रामीण भागातील रस्ते, पायवाट आणि शेतरस्त्यांचे सीमांकण करुन त्यांना नंबर दिला जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आली आहे.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना बाराही महिने रस्त्यांची सुविधा मिळणार आहे. याचसोबत अतिक्रमणाच्या समस्यांवर नियंत्रणदेखील मिळणार आहे. ग्रामीण भागात रस्ता असणे खूप महत्त्वाचे आहे. शेतीच्या कामांसाठी, शेतमाल बाजारात पोहचवण्यासाठी चांगल्या दर्जाचे रस्ते असणे गरजेचे आहे.या निर्णयामुळे आता रस्त्यांचे सीमांकन होईल आणि त्यावरील अतिक्रमण हटवले जाईल. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

काय आहे नवीन निर्णय?

शासनाच्या या नवीन निर्णयानुसार प्रत्येक गावातील तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांच्या मदतीने रस्त्यांची यादी तयार केली जाणार आहे.

ही यादी तहसीलदारांकडे पाठवली जाईल. यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे त्यांचे सीमांकन होऊन हद्दीवर सीमाचिन्हे लावली जातील.

अतिक्रमित रस्त्यांवर मामलेदार न्यायालय अधिनियम, १९०६ अंतर्गत कारवाई होईल आणि आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणेची मदत घेतली जाईल.प्रत्येक रस्त्यावर एक विशिष्ट सांकेतांक दिला जाईल.

रस्त्यांची माहिती मिळावी, यासाठी गाव नमुना नंबर १ (फ) नावाची नवीन नोंदवही सुरु करण्यात आली. यासाठी जिल्हास्तरीय आणि तालुका पातळीवर समित्यांची स्थापना करण्यात आली.

या समित्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी प्रस्ताव तयार करतील आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

4th November Rashi Bhavishay: करिअर अन् पैशांत होणार मोठी वाढ, या 5 राशींचे नशीब आज चमकणार

नेपाळमध्ये मोठी दुर्घटना; बर्फाचा भलामोठा पर्वत कोसळला; ७ गिर्यारोहकांचा जागीच मृत्यू

Shukra Gochar 2025: धनदाता शुक्र पापी ग्रहाच्या घरात करणार प्रवेश; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Signs Of Cancer In Men: सावधान! अचानक वजन कमी झाले अन् थकवा जाणवतो; पुरुषांनो असू शकतात 'या' कॅन्सरची लक्षणे

Maharashtra Live News Update: - फलटण येथील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी नागपुरात डॉक्टरांची शांतता रॅली

SCROLL FOR NEXT