Good News For Gen Z Saam Tv
महाराष्ट्र

Gen Z साठी गुड न्यूज! फडणवीस सरकार देणार रोजगाराची संधी; 1000 रोजगार मेळावे भरवणार, काय आहे प्लान?

Good News For Gen Z: राज्यातील झेन झींसाठी आनंदाची बातमी आहे. फडणवीस सरकार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी 1000 रोजगार मेळावे भरवले जाणार आहे.

Priya More
  • झेन Z साठी महाराष्ट्र सरकारचा जबरदस्त प्लान

  • १००० रोजगार मेळाव्याचे करणार आयोजन

  • महाराष्ट्रातील तरुणांना मिळणार नोकरी

  • रोजगार मेळावा प्रशिक्षण कार्यक्रमाद्ववारे देणार ट्रेनिंग

राज्यातील झेन Z साठी गुड न्यूज आहे. नाराज झेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लान आहे. सरकारकडून राज्यातील झे Z साठी १ हजार रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आदेश दिले आहेत. ३१ मार्च २०२७ पर्यंत १ हजार रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला आहे.

राज्यातील झेन Z तरुण प्रचंड नाराज आहे. या तरुणांना आपल्याकडे खेचण्यासाठी फडणवीस सरकारने जबरदस्त प्लान आखला आहे. झेन Z तरुणांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करणयात येणार आहे. ३१ मार्च २०२७ पर्यंत १ हजार रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्याचा सरकारचा प्लान आहे.

या रोजगार मेळाव्यांची व्यापक माहिती गरजू तरुणांपर्यंत पोहोचण्याचे आदेश कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मंत्री लोढा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय रोजगार मेळावा समितीची बैठक देखील झाली. या बैठकीत राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याचे अध्यक्ष डॉ. रणजित पाटील, सदस्य डॉ. सरोजिनी राऊत, रविंद्र देशपांडे, विशाल टिब्रेवाल, जयेश ढाके, राहुल खोले, सदस्य सचिव तथा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचे आयुक्त डॉ. अमित सैनी यासह शासकीय सदस्य उपस्थित होते.

झेन Z साठी फडणवीस सरकारचा प्लान काय?

- आयटीआय व्यतिरिक्त इतर कॉलेजमधील विद्यार्थी, अपस्किलिंगची गरज असणारे तरुण आणि सामाजिक संस्थांशी संपर्क साधून रोजगार मेळाव्याचा विस्तार करण्यात येणार आहे.

- राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात रोजगार मेळाव्याची माहिती दिली जाणार आहे.

- तरुणांना रोजगाराचे महत्त्व आणि स्वयंरोजगाराचे फायदे पटवून देण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती आणि एनजीओंच्या माध्यमातून समुपदेशन केले जाणार आहे.

- पहिल्या आठवड्यात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, एथिकेट्स (शिष्टाचार), बायोडाटा तयार करणे आणि संभाषण कौशल्यांवर भर दिला जाणार आहे.

- दुसऱ्या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांच्या अ‍ॅप्टिट्यूड टेस्टनुसार इलेक्ट्रिसिटी, प्लंबिंग, रिसेप्शनिस्ट आणि मार्केटिंग यांसारख्या क्षेत्रांत थेट प्रात्यक्षिक दिली जाणार आहे.

- केवळ रोजगार मेळावे आयोजित न करता उमेदवारांना पूर्व-प्रशिक्षण देण्याचा फडणवीस सरकारचा मानस आहे.

- रोजगार मेळाव्यापूर्वी उमेदवारांना दोन आठवड्यांचे कौशल्य आणि पूर्व-रोजगार प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

- उमेदवारांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळाल्यास मेळाव्यांमधील निवडीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढेल, असा फडणवीस सरकारला विश्वास आहे.

- या उपक्रमाच्या नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी संबंधित विभागाचे अधिकारी आणि प्रदेश समन्वय समिती यांनी एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET पेपरफुटी प्रकरणी एकापेक्षा एक खळबळजनक खुलासे, CBI च्या चार्जशीटमध्ये नेमके काय?

Mumbai Local Train : रेल्वे प्रवाशांनो, रविवारी वेळापत्रक बघूनच बाहेर पडा; मध्य रेल्वेवर फास्ट ट्रेनचे थांबे बदलणार, हार्बरवर काही लोकल रद्द

Bollywood Actor Hospitalized: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्याची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया

Maharashtra News Live Update: जळगावात दहावीच्या विद्यार्थ्यावर चॉपरने प्राणघातक हल्ला

Nashik: देवळा-मालेगाव रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू, कारचालक फरार

SCROLL FOR NEXT