Maharashtra Government  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Government: मोठा निर्णय! आता सरकारी कर्मचाऱ्यांनाही ईकेवायसी करावी लागणार; अन्यथा पगार नाही मिळणार

Government Employees Salary eKYC Mandatory: राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांना ईकेवायसी अनिवार्य केले आहे.

Siddhi Hande

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय

सरकारी कर्मचाऱ्यांना पगारासाठी ईकेवायसी करावी लागणार

ईकेवायसी केल्यानंतरच पुढच्या महिन्याचा पगार मिळणार

लाडक्या बहि‍णींनंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांनाही ईकेवायसी करणे अनिवार्य केले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आता पगारासाठी ईकेवायसी करावे लागणार आहे. राज्य सरकारने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना पगार मिळवण्यासाठी ईकेवायसी करावीच लागणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय (Maharashtra Government Employees Big Decision)

राज्यात जवळपास १८ लाख सरकारी कर्मचारी आहे. या प्रत्येक कर्मचाऱ्यांना ईकेवायसी करावी लागणार आहे. ईकेवायसी केल्यानंतर पुढच्या महिन्याचा पगार मिळणार आहे. वित्त विभागाने याबाबत परिपत्रक काढले आहेत. पगार देताना कोणताही गैरप्रकार होऊ नये, कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना दुबार वेतन दिले जाऊ नये, यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना ईकेवायसीसाठी सेवार्थ प्रणालीचा वापर करावा लागणार आहे. यामध्ये सर्व सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचे अकाउंट नंबर, आधार नंबर, पॅन कार्ड अशी सर्व माहिती लिहलेली आहे. यामध्ये काही कर्मचाऱ्यांची दुबार नोंद आढळली. त्यानंतर सरकारनेहा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांना ईकेवायसी करण्यास सांगितले आहे. ईकेवायसी न केल्यास कर्मचाऱ्यांना एप्रिल आणि मे महिन्याचा पगार दिला जाणार नाही.

ईकेवायसी करण्याआधी या गोष्टी कराच (Maharashtra Government Employees eKYC)

कर्मचाऱ्यांची ईकेवायसीअंतर्गत नव्याने नोंद होणार आहे. ईकेवायसी करण्याआधी आधार आणि बँक खाते लिंक असणे अनिवार्य आहे. त्यामुळे तुम्ही जर हे काम केले नसेल तर लगेच करा. याचसोबत प्रत्येक कर्मचाऱ्याला ईकेवायसी पूर्ण करुन त्याचे प्रमाणपत्र संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करायचे आहे. त्यानंतर या कर्मचाऱ्याची सेवार्थ प्रणालीत ईकेवायासीनुसार नोंद केली जाणार आहे. यानंतरच तुम्ही दिलेले बँक खाते आणि सेवार्थ प्रणालीतील बँक खाते सारखे असेल तर पुढे वेतन मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

SCROLL FOR NEXT