Video : मैं मराठी नही बोलूंगी...मुंबई विमानतळावर कर्मचारी तरुणीचा प्रवाशासोबत वाद; Video व्हायरल

Mumbai Airport Viral Video News : मुंबई विमानतळावर मराठी बोलण्यावरून प्रवासी आणि तरुणीमध्ये वाद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे हिंदी-मराठी भाषा वाद पुन्हा चर्चेत आला आहे.
Video : मैं मराठी नही बोलूंगी...मुंबई विमानतळावर कर्मचारी तरुणीचा प्रवाशासोबत वाद; Video व्हायरल
Mumbai Airport Marathi Hindi Controversy Video NewsSaam Tv
Published On
Summary
  • मुंबई विमानतळावर भाषा वाद

  • तरुणीने मराठी बोलण्यास नकार

  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • हिंदी-मराठी वाद पुन्हा चर्चेत

Mumbai Airport Marathi Hindi Controversy Video News राज्यात हिंदी मराठी भाषेचा वाद नवा नाही. अशातच आता मुंबईच्या विमानतळावरचा एका तरुणीचा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये तरुणी मराठी बोलण्यासाठी नकार देत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून आता भाषा वादाच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

सदर व्हिडिओ हा मुंबई विमानतळावरील आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, विमानतळावरील एक तरुणी प्रवाशासोबत उज्जत घालताना पाहायला मिळत आहे. या तरुणीला प्रवासी व्यक्तीने मराठी बोलण्यास सांगितले. त्यावरून तिने प्रवाशी व्यक्तीला "तुम्ही विमानतळावर आहात हिंदीत बोला, मी मराठी बोलणार नाही. तुम्ही कोण आहात आम्हाला मराठीत बोल सांगणारे" असे म्हटले. यानंतर विमानतळावर काही तास हे भांडण असच सुरु राहील.

या प्रकरणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये म्हटले की , "मराठी म्हणजे महाराष्ट्र नव्हे." तर दुसऱ्या एका कमेंटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रात राहून मराठी यायलाच पाहिजे.दरम्यान आता हा वाद किती चिघळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com