Maharashtra Government Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Government: राज्य सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा २२ वर्षांपूर्वीचा नियम बदलला

Maharashtra Government Big Decision: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २२ वर्षांपूर्वीचा नियम बदलला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना खूप फायदा होणार आहे.

Siddhi Hande

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

२२ वर्षांपूर्वीच्या नियमात बदल

सनदी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या क्षेत्रफळात वाढ

महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच्या नियमात तब्बल २२ वर्षानंतर महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या निवासस्थानच्या चटई क्षेत्रफळात पहिल्यांदाच बदल केला आहे. आता निवासस्थानाच्या क्षेत्रफळात वाढ करण्यात आली आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना अजूनच चांगले आणि मोठे घर मिळणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम (New Rules for Government Employees)

सरकारी कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवासस्थान दिले जाते. आता ठरलेल्या नियमांमध्ये राहणीमान, गरजा आणि आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचा विचार करुन १०० ते ७०० चौरस फुटांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी हा मुद्दा गांभीर्याने घेतला. त्यानंतर एक समिती नेमण्यात आली. या समितीनुसार सातव्या वेतन आयोगानुसार नवीन नियम तयार केले. याला मंजुरी मिळाली त्यानंतर निर्णय झाला.

सनदी अधिकाऱ्यांसाठी नियम बदलले

आता वरच्या वेतनगटातील सनदी अधिकाऱ्यांना २५०० चौरस फूट क्षेत्रफळाचे घर मिळणार आहे. याआधीची मर्यादा १८०० चौरस फूट होती. या निर्णयामुळे सनदी कर्मचाऱ्यांना मोठे घर मिळणार आहे.

नवीन नियमात वेगवेगळ्या वेतनगटासाठी क्षेत्रफळ ठरवून देण्यात आले आहे.S-31 गटाला 2400, S-27 ते 30 गटाला 2000, S-19 ते 26 गटाला 1600, S-13 ते 18 गटाला 1000, S-9 ते 12 गटाला 700, एस-5 ते 8 गटाला 600 चौरस फूट घर मिळणार आहे.

नियम कोणाला लागू होणार? (Maharashtra Government Big Decision For Government Employees)

नवीन नियम भविष्यात बांधल्या जाणाऱ्या सरकारी निवासस्थांनासाठी असणार आहे. सध्याच्या घरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.यामुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांच्या मनात कोणताही गैरसमज होणार नाही. नवीन कर्मचाऱ्यांना सुविधा मिळणार आहे, असं सरकारने सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईतील पहिला अंडरग्राऊंड महामार्ग, ४० मिनिटांचा प्रवास ५ मिनिटांत होणार; कसा असेल संपूर्ण मार्ग?

Pune Vidyapeeth: शिक्षकांची माहिती अपलोड करा, अन्यथा प्रवेश बंद; पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय

Pune : मध्यरात्री बुधवार पेठेत पोलिसांचा छापा, 5 बांगलादेशी महिलांना अटक

Maharashtra News Live Update: निदा खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Weak Bones: तरूण वयातच हाडं झाली खिळखिळी? फक्त कॅल्शियम नाही, तर ही लक्षणे दिसल्यास व्हा सावध

SCROLL FOR NEXT