Maharashtra government announces step grant approval for over 52,000 teachers and non-teaching staff with new conditions saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Government: राज्यातील शिक्षकांसाठी सरकारचा मोठा निर्णय, टप्पा अनुदानाला मंजुरी

Maharashtra Government Decision On Teachers: शालेय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने टप्पा अनुदानाला मंजुरी दिलीय. यामुळे ५२ हजारांपेक्षा जास्त शिक्षक व कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

Bharat Jadhav

  • राज्य सरकारने शिक्षक-शिक्षकेतरांसाठी टप्पा अनुदानाला मंजुरी दिलीय.

  • एकूण ५२,२७६ कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होईल.

  • बायोमेट्रिक उपस्थिती आणि डिजिटल रेकॉर्ड बंधनकारक करण्यात आलंय.

राज्य सरकारने शिक्षकांना आनंदाची बातमी दिलीय. राज्यातील शिक्षकांसाठी टप्पा अनुदानास मंजुरी देण्यात आली असून शासन निर्णय जारी करण्यात आलाय. राज्यातील काही अनुदानित शाळांवरील ५२ हजार २७६ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी १ ऑगस्टपासून टप्पा अनुदान मंजूर करण्यात आला. सन २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार पटसंख्या आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांची पदे ग्राह्य धरली जाणार आहेत.

सरकारच्या अटी काय?

पात्र शाळांना पुढील २० टक्के अनुदान मिळणार आहे. दरम्यान यामुळे सरकारच्या तिजोरीवर ९७० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. सरकारने टप्पा अनुदानाचा निर्णय घेतलाय, पण काही अटीदेखील घातल्या आहेत. जर पटसंख्या कमी झाली तर पदे कमी करण्यात येणार आहेत. त्याबाबतचे सर्वाधिकार शिक्षण संचालकांना असणार आहेत. तसेच टप्पा अनुदान घेणार्‍या शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती ‘बायोमेट्रिक’ प्रणालीत नोंदविली गेली आहे ना याची खात्री केली जाईल.

यासोबतच तीन महिन्यांचे डिजिटल रेकॉर्ड बंधनकारक करण्यात आलंय. या अटी पूर्ण करण्यासाठी शाळांना ६ महिन्यांची मुदत देण्यात आलीय. ज्या शाळा अटींचे पालन करणार नाही, त्या शाळांचे अनुदान रोखण्यात येतील. अनुदान रोखण्याचे अधिकार शिक्षण आयुक्तांना देण्यात आलेत. दरम्यान टप्पा अनुदानासाठी राज्यातील विविध शाळांमधील शिक्षकांनी आंदोलन केले होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अनुदानासाठी निधी देण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. आता शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलाय. शिक्षकांची मागणी शासनाने मान्य केल्यामुळे संबंधित शिक्षकांना मोठा दिलासा मिळालाय. शासनाच्या या निर्णयाचे शिक्षकांकडून स्वागत केले जातंय.

असे मिळेल अनुदान

२० टक्क्यांवरील २०७९ शाळा, ४१८३ तुकड्यांवरील १५ हजार ८५९ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी ३०४ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

४० टक्क्यांवरील १७८१ शाळा आणि २५६१ तुकड्यांवरील १३ हजार ९५९ शिक्षक- शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी २७६ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय.

६० टक्के अनुदानावरील १ हजार ८९४ शाळा आणि २१९२ तुकड्यांवरील १९ हजार ७४४ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी ३४१ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी

नव्याने २० टक्के अनुदानासाठी पात्र - ८१ प्राथमिक शाळा आणि ५०५ तुकड्यांवरील ८९० शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, ८१ माध्यमिक शाळा, ११५ तुकड्यांवरील १०८३ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी. तसेच ६९ कनिष्ठ महाविद्यालये आणि ७५ तुकड्यांवरील ७४१ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठीही ४८ कोटी ३२ लाखांचा निधी जाहीर करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kala Chana Chaat Recipe : कांदा-लसूण न घालता झटपट बनवा ढाबा स्टाइल गरमागरम 'काळा चणा मसाला', वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: विक्रोळीत शॉपिंग सेंटरला जवळच्या मीटर बॉक्सला लागली भीषण आग

Rules flouted by police: नियम धाब्यावर? एकाच बाईकवरून तीन पोलिसांचा प्रवास; Video Viral होताच लोक संतापले

Ambernath Politics: अंबरनाथच्या राजकारणाची अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा, भाजपची खेळी त्यांच्यावरच उलटली, शिंदेंनी डाव टाकला, काय घडलं?

Ind vs NZ playing 11 : न्यूझीलंडविरुद्ध कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन? रोहित शर्मा, विराट कोहली खेळणार का? कोण बसेल बाकावर?

SCROLL FOR NEXT