Maharashtra Government X
महाराष्ट्र

आता Caste Certificate एका क्लिकवर मिळणार, फडणवीस सरकारच्या निर्णयाचा सर्वसामान्यांना होणार फायदा

Caste Certificate : जात प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र मिळवताना अर्जदारांना अनेक अडचणी येत होत्या. हा त्रास कमी व्हावी यासाठी राज्य सरकारद्वारे ऑनलाइन प्रणाली सुरु केली जाणार आहे. या प्रणालीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल असे म्हटले जात आहे.

Yash Shirke

जात प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र मिळवताना अर्जदारांना विविध अडचणींचा सामोरे जावे लागत आहे. पुराव्यांची, दस्ताऐवजांची पडताळणी तसेच कार्यालयीन फेऱ्यांमुळे अर्जदारांचा वेळ, श्रम आणि पैसे दोन्ही खर्ची पडतातत. ही प्रक्रिया जलद आणि पारदर्शक व्हावी यासाठी संगणकीय ऑनलाइन प्रणाली विकसित केली जाणार आहे. या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजूरी मिळाली आहे. येत्या काही दिवसात ऑनलाइन प्रणाली लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारी नोकऱ्या, शैक्षणिक प्रवेश, निवडणूक आरक्षण यांच्यासह विविध योजनांसाठी जात प्रमाणपत्र आवश्यक असते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांनी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सध्याच्या प्रक्रियेत अडथळे येत असल्याने प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाही. ही समस्या सोडवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) यांनी एकत्रितपणे संगणकीय प्रमाणी विकसित करण्याचा प्रस्ताव तयार केला. या संदर्भातील बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व विभागांना १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते.

नव्या प्रणालीमध्ये नागरिकांना अर्ज करताना मार्गदर्शन करणाऱ्या नियमाधारित इंटरफेसची मदत होईल. अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी प्रणालीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित फिचर्सचा समावेश केला जाईल. अर्जदाराचे नाव, वडील किंवा पतीचे नाव आणि आधार कार्डमधील मूळ पत्ता या सर्व गोष्टी प्रणालीद्वारे तपासल्या जातील.

मुलभूत माहिती तपासणे आणि कागदपत्रांची पडताळणी करणे यासाठी डीजी लॉकर एकत्रीकरण असणार आहे. यामुळे अर्जदाराच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी जलद आणि खात्रीशीरपणे होऊ शकेल. एका क्लिकवर जात प्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने असंख्य अर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

आताच तिकिट बुक करा! दिवळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर

Anant Chaturdashi 2025: विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पा 'या' राशींना करणार मालामाल; अनंत चतुर्दशीला 4 शुभ महासंयोग देणार पैसा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Mahadev Munde Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात कुटुंबीय असमाधानी; जरांगे पाटलांची घेणार भेट

SCROLL FOR NEXT