Maharashtra government approves five new Gram Panchayat schemes saam tv
महाराष्ट्र

राज्य सरकारचा ग्राम पंचायतींबाबत मोठा निर्णय; पाच नव्या योजनांना मंजुरी

Gram Panchayats Schemes : महाराष्ट्र सरकारने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींसाठी पाच नवीन योजनांना मंजुरी दिली आहे. सार्वजनिक सुविधा आणि ग्रामीण पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी पात्र ग्रामपंचायतींना ९० लाख रुपयांपर्यंतचा विकास निधी मिळणार आहे.

Bharat Jadhav

  • राज्य शासनाने ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी दिली आहे.

  • जिल्हा वार्षिक योजनेतून ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी 90 लाख रुपयांपर्यंत निधी मिळणार आहे.

  • 'ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी विशेष अनुदान' या घटकातून विशेष निधी उपलब्ध करून दिला

राज्य शासनाने ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी दिली आहे. जिल्हा वार्षिक योजनांतर्गत या योजनांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी ९० लाख रुपयांपर्यंत निधी मिळणार आहेत. सध्या जिल्हा वार्षिक योजनेत ‘ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी विशेष अनुदान’ या घटकातून निधी दिला जातो. या योजनेचे निकष २०१० मध्ये निश्चित करण्यात आले होते.

गेल्या काही वर्षांत ग्रामपंचायतींच्या विकासकामांची व्याप्ती वाढल्याने नव्या गरजांसाठी स्वतंत्र निधीची मागणी होत होती. त्यानुसार शासनाने पाच नव्या योजनांना मंजुरी शासनाने दिली आहे. ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रशांत पाटील यांनी काढलेल्या आदेशानुसार, या पाच योजनांतील मंजूर कामांसाठी इतर कोणत्याही शासकीय योजनेतून पुन्हा निधी घेता येणार नाही. एकाच कामासाठी दुहेरी निधीचा वापर होऊ नये, यासाठी ही अट घालण्यात आलीय.

यात योजनांमध्ये गावाच्या हद्दीतील शासकीय पडीक जागांचे सुशोभीकरण करण्यासाठी १५ लाख रुपये, शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा प्रणाली बसविण्यासाठी २० लाख रुपये, वाचनालय इमारतीसाठी २० लाख रुपये, क्रीडांगण विकासासाठी २० लाख रुपये आणि सार्वजनिक दिवाबत्ती व्यवस्थेसाठी १५ लाख रुपयांचा निधी दिला जाईल.

ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करावं लागणार

ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या सदस्यांना १२ महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. तसं न केल्यास निवड रद्द होणार आहे. निर्धारित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केलं नाही तर संबंधित व्यक्तीची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द झाल्याचे मानण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राहुल गांधींच्या परीक्षेत 50% सचिव नापास; परीक्षा पॅटर्नमुळे काँग्रेस यश मिळणार?

Manoj Jarange Patil: कॅबिनेटमध्ये मनोज जरांगेंविरोधात नाराजीचा सूर; भाजपचे मंत्री आक्रमक

Gokul Election: महायुतीत जागावाटपावरून फूट? गोकुळच्या मैदानात अमित शाह?

Mumbai News: नाल्यात टाकत होते कचरा, ड्राय वेस्ट वाहनाला पकडलं; BMC कडून ठेकेदाराला नोटीस

मोठी बातमी! शिंदे गटाच्या नेत्याला शिवसेनेच्या शाखेतच बांबूने मारहाण; धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT