St Bus Saam tv
महाराष्ट्र

ST Employees Salary : साम टीव्हीच्या बातमीचा दणका; एसटी कर्मचाऱ्यांना उर्वरीत पगार मिळणार, VIDEO

ST Employees salary hike : एसटी कर्मचाऱ्यांना उर्वरीत पगार मिळणार आहे. त्यांना उर्वरित ४४ टक्के पगार मिळणार आहे.

Vishal Gangurde

सूरज मसुरकर, साम टीव्ही

एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना उर्वरित ४४ टक्के पगार मिळणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना उर्वरित ४४ टक्के पगार येत्या मंगळवारी मिळणार आहे. उर्वरित पगार मिळणार असल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन देण्यासाठी अपुरा निधी मिळाल्यानं पगारात कपात करण्यात आली होती. एसटी कर्मचाऱ्यांना मासिक पगाराचा ५६ टक्के हिस्सा देण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या निर्णयाचा एसटी कर्मचाऱ्यांनी निषेध केला. अपुऱ्या पगारामुळे एसटी कामगार संघटना आंदोलनाच्या तयारीत होती.

एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा वेतनापोटी ५६ टक्के वेतन देण्याचे आदेश सर्व विभागीय कार्यालयाला देण्यात आले होते. त्यात ७ तारखेला मिळणारे वेतन अनेक कर्मचाऱ्यांना 9 तारखेला मिळाले. त्यानंतर कपात करण्यात आल्याने कामगार संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. मात्र, आता एसटी महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांना उर्वरित पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना उर्वरित ४४ टक्के पगार येत्या मंगळवारी मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात ८७ हजार कर्मचाऱ्यांच्या वेतन देयापोटी ४६० कोटीची गरज होती. मात्र फक्त २७७ कोटी रुपये मिळाले. त्यामुळे उपलब्ध निधीत ५६ टक्के वेतन देऊन ४४ टक्के वेतन कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महामंडळाकडून वेतन आणि इतर खर्च भाग मिळून ९९५ कोटीची मागणी केल्यानंतर फक्त २७२ कोटी ९८ लाख रुपये देण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT