Maharashtra Birth And Death Certificate Fees Increased AI Image
महाराष्ट्र

Birth Death Certificate : महत्त्वाची बातमी! जन्म-मृत्यू दाखल्यासाठी आता मोजावे लागणार दुप्पट पैसे, जाणून घ्या नवे नियम

Birth Death Certificate Fee Hike Update News : जन्म-मृत्यू दाखल्याच्या शुल्कात राज्य शासनाने वाढ केली आहे. नियमित प्रत, दुसरी प्रत, विलंबित नोंदणी आणि दुरुस्तीचे नवे शुल्क व नियम जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • जन्म-मृत्यू दाखल्याची नियमित प्रत आता १० रुपयांऐवजी २० रुपये

  • विलंबित नोंदणी, दुसरी प्रत, जुन्या नोंदींचा शोध आणि नावातील दुरुस्तीचे शुल्कही वाढवण्यात आले

  • दोन वर्षांनंतर जन्म-मृत्यू नोंदणीसाठी न्यायालयाचा आदेश बंधनकारक असेल

  • अमरावती शहरात दरवर्षी २५ हजारांहून अधिक जन्म-मृत्यू दाखले जारी होत असल्याची माहिती

जन्म-मृत्यू दाखला काढणाऱ्या नागरिकांसाठी आता महत्त्वाची बातमी आहे. राज्य शासनाने जन्म-मृत्यू दाखल्यासाठी आकारण्यात येणाऱ्या विविध शुल्कांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील अधिसूचना ३१ जुलै रोजी जारी करण्यात आली असून, त्यामुळे नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.

आतापर्यंत जन्म किंवा मृत्यू दाखल्याची प्रत मिळवण्यासाठी १० रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र, नव्या निर्णयानुसार हे शुल्क दुप्पट करून २० रुपये करण्यात आले आहे. अमरावती महापालिकेत सध्या दाखल्यासाठी १० रुपये शुल्क आकारले जात असून, शासनाच्या नव्या निर्णयानंतर लवकरच सुधारित दर लागू होण्याची शक्यता आहे. केवळ नियमित दाखल्याचे शुल्कच वाढलेले नाही, तर विलंबाने नोंदणी करणे, दाखल्याची दुसरी प्रत घेणे, जुन्या नोंदींचा शोध घेणे तसेच नावात दुरुस्ती करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विविध कारणांसाठी महापालिका किंवा संबंधित कार्यालयात दाखला काढण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना पूर्वीपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.

दरम्यान, जन्म-मृत्यूची नोंद वेळेत न झाल्यास त्यासाठीच्या प्रक्रियेतही महत्त्वाचे नियम कायम ठेवण्यात आले आहेत. एका वर्षापेक्षा अधिक विलंब झालेल्या नोंदीसाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक राहणार आहे. तर दोन वर्षांनंतर जन्म किंवा मृत्यूची नोंद करण्यासाठी न्यायालयाचा आदेश घेणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे विलंब झालेल्या नोंदींसाठी नागरिकांना अतिरिक्त कागदपत्रे आणि प्रशासकीय प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे.

अमरावती शहरात दरवर्षी २५ हजारांहून अधिक जन्म-मृत्यू दाखले जारी केले जातात. त्यामुळे शुल्कवाढीचा परिणाम मोठ्या संख्येने नागरिकांवर होण्याची शक्यता आहे. विशेषतः विविध शासकीय योजना, शैक्षणिक कामे, वारसाहक्क, मालमत्ता व्यवहार किंवा इतर प्रशासकीय प्रक्रियांसाठी जन्म-मृत्यू दाखला आवश्यक असतो. त्यामुळे नव्या शुल्काची अंमलबजावणी कधीपासून होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन

Hartalika Fast : हरतालिकेचा उपवास कधी सोडावा? योग्य वेळ काय? जाणून घ्या

Monday Horoscope: गणरायाचे आगमन अन् 'या' ३ राशींचे नशीब चमकणार; धनलाभासोबत मिळेल मोठी खुशखबर!

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

SCROLL FOR NEXT