Heavy Rains in Gadchiroli Saam Tv
महाराष्ट्र

Gadchiroli Weather Update : गडचिरोलीत मुसळधार पावसाने थैमान, तब्बल १०० गावांचा संपर्क तुटला

Heavy Rains in Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून शंभर गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. भामरागड तालुक्यात अपूर्ण पुलामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.

Alisha Khedekar

  • गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे शंभर गावांचा संपर्क तुटला.

  • भामरागड तालुक्यात अपूर्ण पुलामुळे परिस्थिती गंभीर.

  • शेती, वीजपुरवठा आणि वाहतूक यावर मोठा परिणाम.

  • नागरिकांची तातडीने मदत करण्याची मागणी जोर धरते आहे.

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून अनेक गावांचा संपर्क तुटल्याने नागरिक मोठ्या अडचणीत आले आहेत. हवामान खात्याने आधीच मुसळधार पावसाचा इशारा दिला होता आणि त्यानुसार ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. रस्ते, पूल आणि नद्या ओसंडून वाहत असल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. काही गावांचा पूर परिस्थितीमुळे जिल्हा मुख्यालयाशी संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे.

भामरागड तालुक्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. या तालुक्याचा गडचिरोली जिल्ह्यासह शंभर गावांचा संपर्क खंडित झाला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांनी भामरागड तालुका दत्तक घेतला असूनसुद्धा, येथे विकासकामांचा वेग अतिशय ढिसाळ असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. हेमलकसा–भामरागड राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित असून अजूनही पूर्ण झालेले नाही. या अपूर्ण कामामुळे आज पुन्हा भामरागड तालुका जिल्ह्यापासून तोडला गेला आहे.

पूरामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान, प्रशासनाने मदत व बचाव कार्यासाठी पथके तैनात केल्याचे सांगितले आहे. पूरस्थितीवर सतत लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार बोटी व एनडीआरएफची मदत घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. तरीसुद्धा शंभर गावांचा संपर्क तुटल्याने नागरिकांची चिंता वाढली असून पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती अधिकच बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुरामुळे गडचिरोली गावातील हे मार्ग बंद

  • हेमलकसा भामरागड राष्ट्रीय महामार्ग- पर्लकोटा नदी तालुका भामरागड

  • अहेरी वटरा रस्ता राज्यमार्ग 370 (वटरा नाला)ता. अहेरी

  • तळोधी आमगाव महाल विसापूर राज्यमार्ग-पोहार नदी तालुका चामोर्शी

  • चौडमपल्ली चपराळा रस्ता तालुका चामोर्शी

  • काढोली ते उराडी रस्ता तालुका कुरखेडा

  • शंकरपूर ते डोंगरगाव रस्ता तालुका देसाईगंज

  • कोकडी ते तुलशी रस्ता तालूका देसाईगंज

  • कोपेला झिंगानूर रस्ता स्थानिक नाला तालुका सिरोंचा

  • कोंढाळा कुरुड वडसा रस्ता तालुका देसाईगंज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

Manoj Jarange Warns Ajit Pawar: तुम्हाला पश्चाताप करावा लागेल; मनोज जरांगेंचा थेट अजित पवारांना इशारा

पिपाणी गेली, तुतारी राहिली! शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आयोगाचा दिलासा

Maharashtra Live News Update: अक्कलकोटचे माजी आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांचे निधन

SCROLL FOR NEXT