Gadchiroli News
Gadchiroli NewsSaam tv

Gadchiroli : राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था; नागरिकांचे अनोखे आंदोलन, खड्ड्यात धान पिकाची रोवणी

Gadchiroli News : महामार्गावर मोठे खड्डे पडले असल्याने याठिकाणाहून वाहन चालविण्याची मोठी कसरत होत आहे. पावसाळा सुरु असल्याने खड्ड्यात पाणी साचले असून चिखल देखील झाल्याने दुचाकी चालकांना मोठा त्रास
Published on

गणेश शिंगाडे
गडचिरोली
: राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी च्या अत्यंत खराब अवस्थेमुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. महामार्गावर खड्डे व चिखल झाला असून त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज या विरोधात आंदोलन केले. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे बुजविण्यास प्रशासनाला आलेले अपयश दाखवून देण्यासाठी संतप्त नागरिकांनी या खड्ड्यांमध्ये चक्क धानाचे रोपटे रोवले. तसेच वृक्षारोपण देखील  केले.

गडचिरोलीच्या जिमलगट्टा फाटा येथे सकाळी प्रशासनाचा निषेध करत अनोखे आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केले. गेल्या अनेक महिन्यांपासून या महामार्गाची दुरवस्था झाली असून, वाहन चालक आणि स्थानिक रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खराब रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच वाहतुकीचा वेग मंदावल्याने वेळ आणि इंधनाचा अपव्यय होत आहे.

Gadchiroli News
Crop Insurance : मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांची पिक विम्याकडे पाठ; वर्धा जिल्ह्यातील केवळ ५९ हजार शेतकऱ्यांनी उतरविला विमा

प्रशासनाचा केला निषेध 

परिसरातील नागरिकांकडून अनेकदा महामार्ग दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती. मात्र या मागणीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात होते. याच कारणाने संतप्त नागरिकांनी आज आंदोलन पुकारले होते. यावेळी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करत, नागरिकांनी 'निषेध निषेध निषेध' अशा घोषणा देत आपला संताप व्यक्त केला.

Gadchiroli News
Vitthal Rukmini : विठुरायाला दोन किलो चांदीचा मुकुट; जालना येथील भाविकाकडून मुकुट अर्पण

आंदोलनातून केल्या दोन मागण्या 

आंदोलक नागरिकांनी आंदोलनातून शासनाकडे दोन मागण्या करण्यात आल्या आहेत. यात रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे दहा दिवसात जीएसबी (Granular Sub-base) टाकून भरण्यात यावेत. तसेच रखडलेले महामार्गाचे बांधकाम त्वरित पूर्ण करण्यासाठी कामाला गती देण्यात यावी. या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष गंभीर समस्येकडे वेधले जाण्याची आशा व्यक्त केली जात आहे. अन्यथा, भविष्यात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com