DIESEL SHORTAGE HITS MAHARASHTRA, FARMERS FACE MAJOR CRISIS DURING FARMING SEASON saam tv
महाराष्ट्र

राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर ठणठणाट; डिझेल तुटवड्यानं शेतकऱी मोठ्या संकटात

Diesel Shortage In Maharashtra : आता राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. शेती मशागतीची कामे सुरु झाली आहेत. मात्र ट्रॅक्टरमध्ये टाकायला डिझेलच मिळत नसल्यानं शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलाय. नेमकं राज्यात सध्या काय चित्र आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रोहित कदम, साम प्रतिनिधी

राज्यात इंधन टंचाईमुळे राज्यात नवं संकट उभं ठाकलंय.आधीच इंधनांचे भाव वाढलेले असतानाच आता इंधन तुटवड्याचाही सामना सर्वसामान्यांना करावा लागतोय. पेट्रोल पंपावरील इंधन तुटवड्यामुळे हिंगोलतल्या शेतकऱ्यांची काय अवस्था झालीय पाहा, अशी परिस्थिती इतरही जिल्ह्यांमध्ये आहे. राज्यातल्या विविध जिल्ह्यांत इंधन तुटवड्यामुळे काय परिस्थिती निर्माण झालीये पाहूयात.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे डिझेल भरण्यावरून तुंबळ हाणामारी झाली. वाशिममध्येही अकोला नाका परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल घेण्याच्या वादातून तुफान हाणामारी झाली.

हिंगोली जिल्ह्यातही इंधन टंचाईच्या संकटामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावरच ठिय्या मांडला. जालन्यातही भीषण इंधन टंचाई निर्माण झालीय.अनेक पेट्रोल पंपांवर 'नो स्टॉक'चे फलक लागले.

परभणी जिल्ह्यातही ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक लागले. दुसरीकडे नंदुरबारच्या धडगावमध्ये इंधन संपणार अशा अफवेने मोठा गोंधळ निर्माण झाला.

इंधन मिळावं म्हणून हिंगोलीत एका शेतकऱ्यानं पेट्रोल पंपमालकाचे अक्षऱशः पाय धरलेत. ((आपल्याकडे व्हिज्युअल्स आहेत)) इंधन तुटवड्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केलाय.

शेतकऱ्यांच्या उद्रेकानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. हिंगोलीत जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंप कंपन्यांच्या झोनल अधिकाऱ्यांची बैठक बोलावत कडक कारवाईचा इशारा दिलाय. सध्या मशागतीचे दिवस असूनही ट्रॅक्टरला डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आलाय.

आणि त्यातूनच वाद निर्माण होऊन हाणामारीचे प्रसंग घडतायत. तर दुसरीकडे, पेट्रोल-डिझेल महागल्यानं 'गिग वर्कर्स युनियन'ने प्रति-किलोमीटर 20 रुपयांची वाढ करण्याची मागणी केलीये. एकीकडे महागाईचे चटके सामान्य जनतेला जाणवू लागले असतानाच दुसरीकडे इंधन तुटवड्यामुळे सामान्य जनता दुहेरी संकटात सापडलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT