Crop Damage, Devendra Fadnavis and CM Eknath Shinde SAAM TV/File Photos
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान; शिंदे सरकारकडून शेतकऱ्यांची उपेक्षा

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची चेष्टा केली जातेय का असा प्रश्न राज्यभरातील शेतकऱ्यांना पडला आहे.

डॉ. माधव सावरगावे

chhatrapati sambhaji maharajNagar News: राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची चेष्टा केली जातेय का असा प्रश्न राज्यभरातील शेतकऱ्यांना पडला आहे. कारण रब्बीमध्ये अवकाळी आणि गारपिटीचा मारा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही, अशी माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

यंदाच्या रब्बी हंगामात अवकाळी आणि गारपिटीने नुकसान झालेल्या पिकाच्या नुकसानीनंतर मदत करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र घोषणा होऊन महिना उलटला तरी सरकारचा आदेशही निघाला नाही आणि मदतही शेतकऱ्यांना मिळू शकली नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर आर्थिक संकटात सापडला आहे.

७ मार्चपासून राज्यभरात अवकाळी आणि गारपिटीने धुमाकुळ घातला. यात रब्बी पिकांसोबत फळपिके, फळभाज्याचे नुकसान झाले. त्यानंतर ५ एप्रिल रोजी सरकारने शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली.

मात्र, आता महिना उलटून गेला तरी त्याचा शासन आदेश निघाला नाही. त्यामुळे अवकाळीने सर्वकाही हिरावलेल्या राज्यभरातील जवळपास ३४ लाख शेतकरी ३३०० कोटी रुपये मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

बीड जिल्ह्यात अवकाळीने शेतपीकांचे नुकसान

बीड जिल्ह्यात यंदा मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपीटीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार जिल्ह्यात एप्रिल महिन्यात 9 हजार 321 हेक्टरवरील शेतपीकांचे 33 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तर अवकाळी दरम्यान अंगावर वीज पडून 7 व्यक्तींचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात विविध गावात 445 घरांची पडझड झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

SCROLL FOR NEXT