Farmers working in fields as uncertainty grows over delayed loan waiver benefits in Maharashtra. saam tv
महाराष्ट्र

पहिल्या टप्प्यात थकबाकीदारांना कर्जमाफी? सुरूवातीला 15 हजार कोटींचाच निधी?

Maharashtra Loan Waiver First Phase 15000 Crore Farmers: राज्य शासनाच्या कर्जमाफीकडे बळीराजा डोळे लावुन बसला आहे. मात्र पहिल्या टप्प्यात केवळ 15 हजार कोटींचाच निधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगामात कर्जमाफीचा दिलासा मिळणार नाही, अशी चिन्हे आहेत. पाहूया एक रिपोर्ट

Girish Nikam

अस्मानी संकटांनी बळीराजा हतबल झाला असतानाच कर्जमाफीची त्याला आशा आहे. सुमारे 56 लाख शेतकऱ्यांचे 36 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला पहिल्या टप्प्यात केवळ 15 हजार कोटींचाच निधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सहकार आणि वित्त विभागातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या केवळ थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. त्यांच्या ग्रीन लिस्टसाठी अधिवेशनात तरतूद होईल. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगामात कर्जमाफीचा दिलासा मिळणार नाही, अशी चिन्हे आहेत. तर दुसरीकडे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन अनुदानाचा निधीही थेट डिसेंबरमधील अधिवेशनापर्यंत लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. थकीत आणि चालू कर्ज असलेले नेमके किती शेतकरी आहेत ते पाहूयात..

कोणत्या शेतकऱ्यांची किती आकडेवारी?

दोन लाखांपेक्षा कमी थकीत कर्ज असलेले १६ लाख ७४ हजार शेतकरी

दोन लाखांपेक्षा कमी कर्ज असलेले 12 लाख 71 हजार शेतकरी

दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेले २ लाख ९० हजार शेतकरी

चालू आर्थिक वर्षात अल्प मुदत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या 23 लाख ६३ हजार शेतकरी आहेत.

त्यामुळे पहिल्या टप्प्य़ात यातल्या केवळ थकीत असलेल्यांनाच लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतऱ्यांमध्ये नाराजी पसरलीय. यंदा पाऊस कमी पडण्याचा अंदाज आहे. पेरण्या लांबणीवर पडणार आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग आधीच धास्तावलेला आहे. अशा स्थितीत प्रत्यक्ष कर्जमाफी नेमकी किती शेतकऱ्यांना मिळणार याबाबत आता संभ्रमाचं वातावरण तयार झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT