Maharashtra farmers scheme saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Farmers Scheme : दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार १ लाख रुपये? जाणून घ्या सत्य

Maharashtra Farmers News : दसऱ्याला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात १ लाख रुपये जमा होणार असल्याटी चर्चा व्हायरल होत आहे.

Sakshi Sunil Jadhav

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दसऱ्याच्या तोंडावर शासनाकडून थेट १ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहे. अतिवृष्टी, दुष्काळ आणि पिकांच्या नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी दिलासादायक वाटत असली, तरी या दाव्यामागचं सत्य जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

शेतकऱ्यांना खरंच १ लाख रुपये मिळणार?

सोशल मीडियावर फिरणाऱ्या दाव्यानुसार, दसऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कृषी उपकरणे खरेदी करण्यासाठी पंचायत समित्यांकडून १ लाख रुपये दिले जाणार आहेत. मात्र, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात दसऱ्याला सरसकट १ लाख रुपये जमा होणार असल्याची अधिकृत घोषणा किंवा शासन निर्णय (GR) असल्याची खात्री झालेली नाही. त्यामुळे या दाव्यावर विश्वास ठेवण्याआधी अधिकृत माहिती तपासणे आवश्यक आहे.

१ लाख रुपयांची चर्चा कशी सुरू झाली?

राज्यातल्या अनेक भागांत अतिवृष्टी, पूर, दुष्काळ आणि पिकांच्या नुकसानामुळे शेतकरी अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची मदत घ्यावी, तसेच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, अशा मागण्या विविध शेतकरी संघटना, नेते आणि विरोधकांकडून करण्यात आल्या आहेत. या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर दसऱ्याआधी मदत जाहीर करण्यासाठी सरकारवर दबाब आणण्यात आला होता, मात्र, मदतीची मागणी होणे आणि शासनाकडून प्रत्यक्ष आर्थिक मदत मंजूर होणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

सोशल मीडियावरील दावे

काही सोशल मिडिया पोस्ट, युट्यूब व्हिडिओ आणि इन्स्टाग्राम रील्समध्ये मागण्यांना प्रत्यक्ष सरकारी घोषणेचे स्वरुप देऊन सनसनाटी दावे केले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : बेळगावच्या हत्तरगी टोलनाक्यावर कर्नाटकातील रयत संघटनेचे आंदोलन सुरू

Dalgona Coffee Recipe: संध्याकाळी नाश्त्यासोबत घरी झटपट बनवा कॅफेसारखी फेसाळ आणि क्रीमी डालगोना कॉफी

पीएम किसान योजनेतून ४,००० नावे वगळली जाणार; शासनाकडून कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन, काय आहे कारण?

Kuttu Flour Puri Recipe : उपवासाची कुट्टूची पुरी बनवताना तुटते? पिठात मिसळा 'हा' पदार्थ, पुरी होईल कुरकुरीत अन् टम्म फुललेली

Chilled Water: थंड पाणी पिणे फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या शरीरावर होणारे ७ परिणाम!

SCROLL FOR NEXT