शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पुन्हा लांबली आहे.
कृषिमंत्र्यांनी आता कर्जमाफीसाठी नवी डेडलाईन जाहीर केली आहे.
शेतकरी कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार?
राज्य सरकारनं जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीबाबत एक मोठी बातमी आहे. शेतकरी कर्जमाफी देण्यास अजून मुर्हूत लागला नाहीये. सरकारकडून तारखांचा खेळ खेळला जातोय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थ संकल्पावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती.
शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी दिली जाईल अशी घोषणा केली होती, मात्र आता सरकारची ही डेडलाईन हुकली आहे. आता कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीसाठी नवी तारीख जाहीर केली आहे. विधानसभेत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
कृषी समृद्धी योजनेसाठी निधी दिला जात नसल्याचा मुद्दा भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना कृषिमंत्री भरणे यांनी नव्या तारखेची घोषणा केली आहे.
राज्यपालांच्या सहीचे कारण देत प्रत्यक्ष अंमलबजावणीला वेळ लागणार असल्याची ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी विधानसभेत दिलीय. शेतकरी कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना ५ जुलैपासून मिळेल, अशाही महत्वपूर्ण महितीही त्यांनी यावेळी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. या योजनेसाठी २ हजार कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्याच्या अधिवेशनात पुरवणी मागण्यात देखील आणखी ३ हजार कोटी रुपयांची तरतुद केली जाणार असल्याची माहितीही भरणे यांनी दिली आहे.
तसेच कर्जमाफीसाठी आवश्यक असलेल्या आर्थिक तरतुदीला विधिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर ती राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येईल. त्यावर स्वाक्षरी झाल्यावर निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचं कृषिमंत्री सोमवारी म्हणालेत. यानुसार शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ ५ जुलैपासून मिळेल. एकीकडे कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. यामुळे जूनअखेर कर्जमाफी देण्याचा सरकारचा वादा फसलाय.
कर्जमाफीच्या प्राथमिक अंदाजानुसार ५६ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यासाठी ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची रक्कम लागणार आहे. तर योजनेतील अटी, सुधारणावरून सरकारला विरोधकांनी धारेवर धरल्यानंतर त्यात बदल करण्यासंदर्भात उपसमिती सकारात्मक निर्णय घेणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितले आहे, असं कृषिमंत्री भरणे म्हणालेत.
सरकारच्या चाल ढकलीमुळे शेतकरी अडचणीत येत आहे. यावरून आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारचा जोरदार हल्लाबोल चढवला आहे. कर्जमाफीवरुन सरकारचं टाईमपास सुरू आहे. पुढची तारीख सांगितली जात आहे, याचा अर्थ तारीख पे तारीखचे नाटक सरकारकडून सुरू असल्याचं शेट्टी म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.