Shreya Maskar
मूत्रपिंड निकामी होण्याची मुख्य लक्षणे स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये बऱ्याच अंशी सारखीच असतात. शरीरात टाकाऊ पदार्थ आणि द्रव साचल्यामुळे ही लक्षणे उद्भवतात. तरीही हार्मोन्स फरकांमुळे दुय्यम लक्षणे, धोक्याची सुरुवातीची चिन्हे किंवा आजाराचे निदान होण्यातील सुलभता यांबाबत काही फरक असू शकतात.
रात्री लघवीसाठी वारंवार जागे होणे, किंवा लघवीत फेस येणे, बुडबुडे येणे, गडद रंग दिसणे किंवा रक्त येणे.
सकाळी डोळ्यांभोवती सूज येणे, शरीरात पाणी साठल्यामुळे घोटे, पाय आणि हात सुजणे.
किडनी लाल रक्तपेशी तयार करणारे संप्रेरक (ॲनिमिया) पुरेसे तयार करणे थांबवल्यामुळे सतत खूप अशक्त आणि थकल्यासारखे वाटणे.
फुफ्फुसांमध्ये अतिरिक्त द्रव साठल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे. महिलांना चालताना आणि धावताना दम लागतो आणि त्रास होतो.
पोटात मळमळणे, उलट्या होणे, अन्नाची चव वेगळी किंवा धातूसारखी लागते. तसेच वारंवार भूक लागते.
रक्तातील खनिजे आणि टाकाऊ पदार्थांच्या असंतुलनामुळे शरीराला सतत, खोलवर खाज सुटते. तसेच चेहऱ्यावप पिंपल्स येतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.