Health Minister Prakash Abitkar addressing the legislature on the fake medicine scam in Maharashtra's district hospitals. Saam Tv
महाराष्ट्र

Fake Pharma Racket: सरकारी दवाखान्यात बोगस औषध, शेल कंपन्यांकडून बोगस औषध पुरवठा

Fake Pharma Racket Rocks Maharashtra: राज्यातील सरकारी दवाखान्यांना औषधं पुरवणाऱ्या बोगस कंपन्यांचा भांडाफोड झालाय... या कंपन्यांनी कशा पद्धतीने सरकारी रुग्णालयांना बोगस औषधं पुरवले आणि त्यावर विधीमंडळात कसे पडसाद उमटले?

Suprim Maskar

शासकीय रुग्णालयात बोगस औषध प्रकरणाचं मोठं रॅकेट उघड झालंय... धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्हा रुग्णालयाला पुरवठा केलेल्या बोगस औषध प्रकरणी चक्रावून टाकणारी माहिती समोर आलीय.. धाराशिव, नांदेड आणि लातूरच्या सरकारी रुग्णालयांना औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्या अस्तित्वातच नसल्याची कबुली थेट आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांनी दिलीय.

बोगसगिरी'नं अवघा महाराष्ट्र पोखरला

औषध कंपन्यांशी सरकारकडून पत्रव्यवहार करण्यात आला

पुरवठा करणाऱ्या कंपन्या अस्तित्वात नसल्याचा धक्कादायक खुलासा

सरकारवर पत्र, ईमेल, एवढचं नाही तर व्हॉट्सअॅप नोटीस पाठवण्याची नामुष्की

जया एंटरप्रायझेस, अॅक्टीवेन्टीस, काबिज जेनेरीक, वेस़डन फार्मा या कंपन्यांचे रॅकेट उघड

तिन्ही कंपन्यांविरोधात धाराशिव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

खरंतर जिल्हा रुग्णालय म्हणजे सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य मंदिर .. मात्र या आरोग्य मंदिरात बोगस औषधांच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचा प्रकार समोर आला.. मात्र ही बोगसगिरी कशी पोसली जाते? आणि या कंपन्यांची मोडस ऑपरेंडी कशी असते? हे सांगत तज्ज्ञांनी प्रशासकीय यंत्रणेची चिरफाड केलीय.

राज्यात सरकारी रुग्णालयांना बोगस औषध पुरवणाऱ्या कंपन्याच बोगस नाहीत तर सगळीकडेच बोगसगिरीचा सुळसुळाट असल्याचं चित्र आहे...बोगस पीकविमा, बोगस बियाणं, बोगस नोटाच्या माध्यमातून बोगसगिरी सुरु आहे... त्यामुळे राज्यातली ही बोगसगिरी कुणाच्या आशीर्वादाने सुरु आहे? त्याचा शोध घेऊन बोगसगिरीचा पर्दाफाश करण्याची गरज आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: संभाजीनगरमध्ये अपघाताचा थरार, भरधाव ट्रकने एकाच कुटुंबातील चौघांना चिरडलं, वडिलांसह २ मुलांचा जागीच मृत्यू

GK: चॉपस्टिक्सचा शोध कधी आणि का लागला? जाणून घ्या त्यामागील खरे कारण

Maharashtra Live News Update: अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर...

Ration Card KYC: कामाची बातमी! रेशन कार्ड केवायसी करण्याची मुदत वाढली; शेवटची तारीख काय?

Varsha Usgaonkar : वर्षा उसगांवकर अन् अशोक सराफ पुन्हा एकत्र, सेटवरचा फोटो समोर

SCROLL FOR NEXT