A fake godman in Maharashtra arrested for allegedly cheating cancer patients with false promises of miracle cures. saam tv
महाराष्ट्र

कॅन्सर रुग्णांना लुटणारा बाबा, उपचारांच्या नावाखाली आर्थिक लुटीचा धंदा

‘Miracle Cure’ Scam: राज्यात सध्या भोंदूबाबांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय. भोंदू अशोक खरातनंतर आता आणखीन एका भोंदूबाबाचा धक्कादायक प्रताप समोर आलाय...कॅन्सर रुग्णांना बरं करण्याच्या नावाखाली भोंदूबाबा भक्तांची कशी फसवणुक करत होता

Suprim Maskar

राज्यातील अनेक ठिकाणी भोंदूबाबांनी पुरोगामी महाराष्ट्राची लक्तर पार वेशीला टांगली आहेत. यात संगमनेरच्या आणखी एका भोंदूबाबाची भर पडली आहे. संगमनेरच्या वडगावपानच्या 'दत्तधाम सरकार'मध्ये रुग्णांना गंडवण्य़ासाठी काळीकृत्य करणारा भोंदू समोर आलाय...स्वत:ला ग़डगे महाराज म्हणावणारा हा भोंदू कॅन्सरसारखा आजार बरा करण्याचा दावा करायचा....संगमनेरचा भोंदूबाबा राजेंद्र गडगे लोकांना कसा फसवायचा...

भोंदू गडगे याने स्वतःला दैवी शक्ती प्राप्त असल्याचे भासवून 'दत्तधाम सरकार' नावाचे यूट्यूब चॅनल सुरू केलं. या माध्यमातून तो कर्करोगासारखे गंभीर आजार मंत्रशक्तीने बरे करणे, मूल नसलेल्या महिलांना मूल प्राप्त करून दिल्याचा दावा करायचा. तसेच घरातील विविध समस्या दूर करण्याचे खोटे दावे करत असे. समस्या निवारणासाठी हा भोंदू भक्तांकडून 15 हजारांपासून ते 51 हजार रुपयांपर्यंत रक्कम उकळत असे. तसंच, उपचाराच्या नावाखाली पालापाचोळ्याचे औषध देऊन रुग्णांच्या जिवाशी खेळ करायचा. गेल्या 10 वर्षांपासून त्याने शेकडो लोकांचे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचे उघड झालंय.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं भोंदू गडगेच्या काळ्या कृत्यांसंदर्भात पोलिसांना निवेदन दिलं होतं. मात्र या भोंदूबाबानं थेट अंनिसच्या कार्यकर्त्यांचे व्हिडिओ काढून स्टिंग ऑपरेशन केल्याचा आणि अंनिसचे कार्यकर्ते आपल्याकडे पैसे मागत असल्याचाही दावा केला होता... खरात प्रकरणानं आधीच भोंदूबाबांचा नंगानाच महाराष्ट्र रोज उघड्या डोळ्यांनी पाहतोय... त्यामुळे भोंदूबाबा गडगे महाराजाविरोधात अंनिस आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या...

याआधी नाशिकचा भोंदू खरात, मालाडमधला रिदम पांचाळ, कोल्हापुरातील चुटकीवाला बाबा याच्यावर कारवाई करण्यात आलीय...त्यानंतर आता संगमनेरचा भोंदू गडगे कॅन्सर बरा करण्याचा दावा करून लोकांची आर्थिक फसवणूक करत असल्याचं तपासात पुढं आल्यानं महाराष्ट्रात अघोरींचा सर्रास नंगानाच सुरू आहे. 2013 साली जादूटोणा विरोधी कायदा होऊनही नागरिकांना अंधश्रद्धेच्या नादी लावून भोंदूगिरीचा बाजार मांडणाऱ्यावर पोलीसाचं वचक का नाही? श्रद्धेच्या नावाखाली लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर प्रशासन कधी कारवाई करणार, हाच खरा प्रश्न आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

Maharashtra News Live Update: पुणे विषारी दारू प्रकरण, दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

भाजपचा दणदणीत पराभव! 'आप'चा 900 जागांवर विजय, काँग्रेसची अवस्था काय?

Avoiding Chips and Cold Drink: चिप्स खाणं आणि कोल्ड ड्रिंक्स पीणं २१ दिवस बंद केल्यावर शरिरावर काय परिणाम होतो?

Manoj Jarange: मोठी बातमी! २ तासांच्या चर्चेनंतरही तोडगा नाही, मनोज जरांगे उपोषणावर ठाम

SCROLL FOR NEXT