marathwada  Saam tv
महाराष्ट्र

नांदेडचे नगरसेवक हॉटेल पॉलिटिक्सचे लाभार्थी; विधानपरिषद निवडणुकीत लाडक्या नगरसेवकांची चंगळ, VIDEO

nanded politics : मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलयं... मात्र नांदेडच्या देगलूरचे नगरसेवक मात्र गोव्यात मस्तीत दंग आहेत...विधानपरिषद निवडणुकीत हॉटेल पॉलिटिक्सचे लाभार्थी ठरलेल्या नगरसेवकांवरचा हा विशेष रिपोर्ट

Snehil Shivaji

राज्यात एल निनोचं संकट गडद होत चाललंय. अर्धा जून उलटला तरी पावसाचा पत्ता नाही मोठ्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर महाराष्ट्र उभाये. या मोठ्या संकटावर तोडगा काढण्यात लोकप्रतिनिधी व्यस्त असतील असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ही दृष्य पाहा...

गोव्याच्या बीचवर नाचणारे.....स्विमिंग पूलमध्ये ग्रुप डान्स करणारे हे सर्व नांदेडचे नगरसेवक आहेत....हे सर्व नांदेडमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे विधानपरिषद निवडणुकीतले हे मतदार आहेत. आणि त्यांना खूश ठेवण्यासाठी उमेदवारांनी कोणतीही कसर ठेवलेली नाही. त्यामुळेच सध्या राज्यात सुरू असलेल्या विधन परिषद निवडणुकीच्या हॉटेल पॉलिटिक्सचे हे सर्व लाभार्थी आहेत...मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या बागाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

तर दुसरीकडे पावसानं दडी मारल्यामुळे धरणानीं तळ गाठलाय आणि पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे प्रचंड हाल होतायत. हंडाभर पाण्यासाठी काही किलोमीटर पर्यंत पायपीट करत महिलांना जावं लागतंय. राज्यात पाणी कपात सुरु झालीये.. पण या सगळ्यांचं या नगरसेवकांना कसंल सोयरंसुतक...? अजितदादांच्या राष्ट्रवादीचे हे नगरसेवक असले तरी या निमित्तानं विरोधकांनी भाजपवर निशाणा साधलाय. तर माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाणांनी मात्र या नगरसेवकांच्या मौजमस्तीचं समर्थन केलंय.

याला केवळ नांदेडचेच नगरसेवक अपवाद नाहीत...तर नाशिकमध्येही महायुतीचे सर्व नगरसेवक पर्यटनासाठी गेले आहेत. त्य़ामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या विधानपरिषदेच्या निवडणुका म्हणजे लाडके नगरसेवक आणि झेडपी सदस्यांसाठी लॉटरीपेक्षा कमी नसल्याचंच दिसतंय. कुणाची गोव्याच्या बीचवर मजामस्ती...तर कुणाची राज्यातल्या महागड्या हॉटेल्समध्ये बडदास्त....ज्या सामान्य मतदारानं यांना महागडा मतदार केलंय ते मात्र डोळे आभाळाकडे लावून पावसाची प्रतीक्षा करतायत आणि पाण्यासाठी दहादिशा फिरतायत..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Bus Accident: मनोरुग्ण प्रवाशानं बसचं स्टेअरिंग ओढलं; दोन स्कूल बस धडाधड धडकल्या

Nashik Earthquake: नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के; शेतजमिनींना भल्या मोठ्या भेगा, घराच्या भिंती थरथरल्या

आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार, राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली वंदे भारत एक्स्प्रेस; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टीक आहार गायब, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT